• बालाजी हायस्कूल जिवती येथे लोकमान्य टिळक यांची पुन्यातिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी, कृष्णा चव्हाण
जिवती : दिनांक :- 01 ऑगस्ट 2025 रोजी बालाजी हायस्कूल जिवती येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. साहित्यरत्न आणि लोकशाही डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे 105 चा जयंती निमित्त जिवती शहरात त्यांच्या पुतळ्यालां पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक ,भगत सर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त केले. व मुख्याध्यापकांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवन चरित्रावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक शेंडे , पवार , आडे, bembde, वाघमारे मॅडम ,नंदाताई musane व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते.


