⬜♥️⬜मैत्री⬜♥️⬜
मैत्री असावी जीवनात अशी
जिथे असावी जाणीव हक्काची
मन मोकळे करता यावे
झालर त्यात मायेच्या शब्दाची…..1
मैत्री असावी जीवनात अशी
कृष्ण सुदामाच्या निस्वार्थ प्रेमाची
युगायुगात तेजात आहे
गोडी त्यात सुक्या पोह्यांची …..2
मैत्री असावी जीवनात अशी
मनातील भाव समजण्याची
गरज नसावी त्याला
डोळ्यातील तरारल्या आसवांची…..3
मैत्री असावी जीवनात अशी
अमूल्य ठेव जीवनाची
ग्रीष्माच्या त्या काहीलीत
मंद झुळूक जशी वाऱ्याची….4
⬜⬜⬜⬜⬜⬜⬜⬜
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
⬜⬜
🟨🟧सौ.वैजयंती विकास गहूकर
सहज सुचलं काव्यकुंज सदस्य
⬜⬜चंद्रपूर


