विदर्भातील प्रख्यात साहित्यिक मेघा धोटे यांचे सहज सुचलंशी अतुट नाते-मायाताई कोसरे
संयोजिका रंज्जू मोडक ,नलिनी आडपवार व शिवानी झाडे यांचेही कार्य तेवढेच उल्लेखनीय!
चंद्रपूर -किरण घाटे



विदर्भातील जेष्ठ साहित्यिक व दीर्घ कालावधी पासून निष्ठेने व प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मार्गदर्शिकाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणा-या मेघा धोटे यांचे नाते सहज सुचलंशी अतुट जुळले असून सामाजिक क्षेत्रासोबतच साहित्य क्षेत्रात त्यांची कामगिरी अतुलनीय व उल्लेखनीय असल्याचे मत समाजसेविका तथा योगशिक्षिका मायाताई कोसरे यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमाची सांगता झाल्या नंतर त्यांनी या प्रतिनिधीशी आज मनमोकळेपणे संवाद साधला.
सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक ,साहित्यिक व कला क्षेत्रातील तरुणींच्या कलागुणांना सदैव प्रोत्साहन देणारा
सहज सुचलं हा गृप प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून अनेक कर्तृत्ववान पुरस्कार प्राप्त महिला व तरुणी ह्या गृपवर कार्यरत असल्याच्या कोसरे म्हणाल्या!
मेघा धोटे यांचे कर्तृत्व फार मोठे आहे.त्यांची स्तुती व कौतुक करावे तेवढे कमीच आहे.त्या चंद्रपूर व नागपूर आकाशवाणीच्या कार्यक्रमात जावून आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.रंज्जू दिलीप मोडक ह्या गत चार वर्षांपासून सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका असल्याचे त्यांनी परत एकदा सांगितले.
याच गृपवर विदर्भातील जेष्ठ लेखिका विजया भांगे, डॉ.स्मिता मेहेत्रे, प्रा.वैशाली राऊत ,प्रा.सुनंदा पाटील, सुपरिचित कवयित्री मंगल मिसाळ, समाजसेविका नयना झाडे,ॲड.कविता मोहरकर, कल्पना बनकर, जेष्ठ लेखिका उषाकिरण आत्राम, विजया तत्वादी, वंदना हातगांवकर, चंदा कामडी, नलिनी आडपवार, योगशिक्षिका वैजयंती गहुकर, कवयित्री शैला चिमड्यालवार, साधना धकाते,रजनी रणदिवे, मुग्धा गायकवाड, मीनाक्षी गुजरकर, कोकिळा पोटदुखे, सुवर्णा लोखंडे, अंजली खंडाईत -कोसुरकर,ॲड.अंजली गुंडावार, पोर्णिमा किर्तीवार,संजीवनी धांडे, मृणाल कांबळे, सविता कोट्टी, सीमा पाटील, रश्मि हिवरे, नजमा शेख, अंजली इटनकर, अपर्णा चिडे, चैताली आतराम, शिवानी झाडे रश्मी पचारे, ऐश्वर्या मंडाले, नूपुर मोडक, सोनाली चंदनखेडे,कविता जुमडे, प्रियंका गायकवाड,प्रांजू मखरे सरोज हिवरे,ॲड.सारिका टेंभरे ,सोंदार्य मंडाले, मेघा भांडारकर, डॉ.सुचिका बूक्कावार, समता बन्सोड, अर्चना सुतार, अर्चना चावरे आदिं कर्तृत्ववान व पुरस्कार प्राप्त महिला व तरुणींचा समावेश आहे.
गत वर्षी मूल नगरीच्या पत्रकार भवनात लोकहितच्या वतीने थाटात पार पडलेल्या एका कार्यक्रमात सहज सुचलंच्या तब्बल तेरा महिलांना कर्तृत्ववान सन्मान महिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.


