• बंजारा समाज बांधवांतर्फे
महानायक वसंतराव नाईक स्मृतिदिन व तिज उत्सव कार्यक्रमांच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न!
• कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती!
चंद्रपूर – किरण घाटे
चंद्रपूर : काल रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ ला उर्जानगर येथील स्नेहबंध सभागृहात बंजारा बांधवा तर्फे महानायक वसंतराव नाईक स्मृतीदिन तथा तसेच तिज उत्सव कार्यक्रमांच्या निमित्ताने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा थाटात पार पडला.दरम्यान आयोजित या भव्य कार्यक्रमाला चंद्रपूरसह जिल्ह्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी पार पडलेल्या कार्यक्रमाला चंद्रपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय राठोड यांनी उपस्थित समाजबांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी विजय राठोड, प्राध्यापक विश्वनाथ राठोड जुही राठोड व वर्षा राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे चंद्रपूर निवासी तारासिंग जाधव ,शाम राठोड, शितल जाधव , अर्चना जाधव,शाम चव्हाण ,जय राठोड, अशोक जाधव, भिम राठोड रंजना जाधव ,शालू चव्हाण व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


