#Jivti
• जिवती पोलिसांची गांजा विक्रेत्याच्या घरी धाड!
• गांजा विक्रेता गजाआड
सुवर्ण भारत: कृष्णा चौहान
उपजिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
जिवती:- जिवती येथील पोलीसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापाळा रचत दि.२८ ऑगस्टला शेणगाव येथील संभाजी उर्फ पिंटू शिवाजी कत्ते यांच्या घरी धाड टाकली असता अवैधरित्या गांजा आढळून आला.सदरहु इसम गांजाची चिल्लर विक्री करीत असल्याचे दृष्टीक्षेपात पडले.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती पोलीस स्टेशनच्या पथकातील प्रवीण जाधव निखिल रहाटे, नारायण गवाले, जगदीश मुंडे, ज्ञानेश्वर डोकळे, किरण वाटोरे, भाविक टेकाम, अभिषेक आडे, प्रियंका राठोड, शिल्पा कातकर, यांनी ही यशस्वी धाड टाकली.दोन पंचासमक्ष सदरहु आरोपीच्या घराची झडती घेतली असता आरोपीच्या घराच्या स्वयंपाक खोली मधून एका निळ्या रंगाचे ड्रम मध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एकूण ८६० ग्राम गांजा आढळून आला.त्याची एकून किंमत ८६०० रुपये असल्याचे समजते. तो गांजा पोलिसांनी जप्त केला .
सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन जिवती येथे अपराध क्रं.११४/२०२५ कलम ८(क),२०(ब) NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.


