#Ballarpur
• ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बल्लारपूरमध्ये काँग्रेसच्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव
सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी
बल्लारपूर :ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरातील संघमित्रा चौक परिसरात काँग्रेस पक्षाच्या नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. प्रदेश काँग्रेस सचिवपदी नियुक्त घनश्याम मुलचंदानी यांचे अँड सय्यद व प्रीतम पाटील यांनी स्वागत केले. तर बल्लारपूर शहर काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्त पापा आर्या यांना अरिफ भाई सिद्दीकी व शेख पप्पू यांनी अभिनंदनपर पुष्पगुच्छ देऊन गौरविले.
गांधी भवन निर्मितीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल अब्दुल करीम यांचा शेख मुबारक व अख्तर खान यांनी सन्मान केला. सामाजिक कार्याबद्दल डॉ. रजनी ताई हजारे यांना अफसाना सय्यद व डॉ. ईशा सय्यद यांनी शाल अर्पण करून गौरविले.
इस्माईल भाई ढाकवाला, बोपनवर, प्रानेश अमराज यांचे ही सामाजिक योगदानासाठी सन्मानित केले.
यावेळी अँड मेघा भाले, छाया मडावी, आमकूबाई भुक्या, भास्कर माकोडे यांना देखील वॉर्डवासीयांनी शाल देऊन सन्मान केला. कार्यक्रमाचे संचालन अँड पवन मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अँड सय्यद, प्रीतम पाटील, अरिफ भाई, सुहान शेख, पप्पू शेख, इम्रान शेख, शकील भाई, समीर, मेहबूब भाई, नरेश मुन, आशा बोरसारे, अकील शेख, राष्ट्रपाल लभाने, किशोर हरडे, पुरुषोत्तम पाटील, सईदा बाई, निषाद बाई आदींसह मोठ्या संख्येने वॉर्डवासी उपस्थित होते.



