Home Breaking News #Chandrapur • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतले चंद्रपूरातील गणरायांचे दर्शन!

#Chandrapur • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतले चंद्रपूरातील गणरायांचे दर्शन!

72

#Chandrapur
• माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतले चंद्रपूरातील गणरायांचे दर्शन!

सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी काल शुक्रवारी संध्याकाळी शहरातील “चंद्रपूर राजाचे “दर्शन घेतले.
या वेळी चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अध्यक्ष बेबीताई उईके व विद्यार्थी अध्यक्ष परब गिरडकर उपस्थित होते.
.त्या नंतर त्यांनी जोडदेऊड गणेश मंडळाच्या “चंद्रपूरचा महाराजा”येथे भेट दिली. माजी मंत्री देशमुख यांनी पठाणपूरा मार्गावरील संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून विनम्र अभिवादन केले.
चंद्रपूरच्या महाराजाचे दर्शनानंतर गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश बनकर यांनी माजी मंत्री देशमुख यांचा सत्कार केला.या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.