#Chandrapur
• गणपती बाप्पा मोरया- पुढल्या वर्षी लवकर या जयघोषात चंद्रपूरच्या भाविकांनी दिला गणरायांना प्रेमाने निरोप
• जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त
• विसर्जन सोहळा बघण्यासाठी भक्तगणांची लोटली अमाप गर्दी
• मिरवणूकीत विविध मंडळांचे लक्षवेधक व आकर्षक देखावे
• विसर्जनस्थळी मोठ्या सर्च लाईटची व्यवस्था
• मुख्य मार्गावरील चौकात उभारल्या होत्या मचानी, तब्बल 88 सीसीटीव्हींचा मिरवणुकीवर होता वाॅच !
चंद्रपूर : किरण घाटे
चंद्रपूर:
दहा दिवसानंतर आज शनिवारी
चंद्रपूरकरांच्या भक्तगणांनी आपल्या लाडक्या बाप्पाला “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर
या ” या जयघोषात प्रेमाने निरोप दिला.
दहा दिवस शहरातील वातावरण अतिशय भक्तीमय झाले होते.
दुपारी चार नंतर ख-या अर्थाने सार्वजनिक मंडळांच्या गणेश विसर्जनाला सुरूवात झाली होती.
जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने कायदा शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातून ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातील गांधी चौक, जटपूरा गेट, गिरणार चौक प्रियदर्शनी चौक भक्तगणांच्या गर्दीने अक्षरशः फूलून गेले होते.मुख्य मार्गावरील चौकात गणेश विसर्जन मिरवणूकीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मचानी उभारण्यात आल्या होत्या.या ठिकाणी पोलिस कर्मचारी सातत्याने कार्यरत असल्याचे दिसून आले तर विसर्जनसथळी मोठ्या सर्च लाईटची व्यवस्था करण्यात आली होती.यंदा विठ्ठल मंदिर प्रभागातील गणेश मंडळाने आकर्षक देखावे सादर करुन चंद्रपूरकरांचे लक्ष वेधले.राजकीय व सामाजिक संघटनेच्या वतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. शहरातील बहुतेक सर्वच राजकीय पक्षांचे यंदा स्वागत मंडप दिसून आले.
थाटात उत्साहात व आनंदात पार पडलेल्या या गणेश विसर्जन मिरवणूकीत आज भजन मंडळी दिसून आली.तर डिजेच्या आवाजात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे पाय थिरकत असल्याचे दृष्य अनेक ठिकाणी बघावयास मिळाले .
काही ठिकाणी राजकीय व सामाजिक संस्थेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंडपस्थळी भाविकांची गर्दी दिसून आली.इतकेच नाही तर महाप्रसादासाठी काही ठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
शहरातील तीन न्यूज चॅनलनी लाईव्ह (प्रक्षेपण) दाखविले .त्यामुळे अनेकांनी घरबसल्या हा नेत्रदीपक सोहळा बघीतला.तब्बल 88 सीसीटीव्हींचा वाच या शोभायात्रेवर होता.शहरातील काही सामाजिक संघटनेनी पुढाकार घेत पाणपोईची व्यवस्था करुन भाविकांची तृष्णा भागविली.विदर्भात प्रख्यात असलेला चंद्रपूरचा हा देखना व नेत्रदीपक सोहळा बघण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक भक्तगण आज सकाळीच चंद्रपूरात दाखल झाले होते.रात्री उशिरा पर्यंत शहरातील गणरायांचे विसर्जन झाले



