गणपती विसर्जना दिनी पट्ट्याने बासरीतून हिंदी फिल्म गाऊन चंद्रपूरातील रसिकांचे लक्ष वेधले!
सुवर्ण भारत: किरण घाटे
विदर्भ विशेष प्रतिनीधी
चंद्रपूर : काल शनिवार! वेळ दुपारची ! अक्षरशः रखरखती उण डोक्यावरून जात होती.त्यातच या शहरातील गणेश विसर्जन सोहळा!
सकाळपासून खेळणी साहित्य घेवून हा पट्टा ग्राहकांची वाट बघू लागला होता.
परंतु गणेश विसर्जन सोहळा बघण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत भक्तगणांची गर्दी झाली नव्हती.
रस्त्याकडे एकटक त्याचे डोळे लागले होते.ग्राहकांची वाट तो बघत होता. पण ग्राहक त्याच्याकडे फिरकेना!
सतत उन्हात उभे राहून त्यालाही कंटाळा आला होता .मग
हळुच हातात बासरी घेतली अन् तो चक्क बासरीतून गायला लागला.
बासरीतून गोड व मधुर सुर बाहेर पडले.अन् रस्त्यावरुन येणारे जाणारे अनेक जण अवाक् झाले.
काय सुंदर बासरी वाजतोय या प्रतिक्रिया त्यांचे मुखातून बाहेर पडल्या ! गीताची बोलही तशी लोकप्रियच होती!



