#Chandrapur
• नवनियुक्त भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघाचे महामंत्री पदी मनोज कोंडेकर
सुवर्ण भारत : पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घुस : दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रविवार रोजी भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघाचे कार्यालयात नवनियुक्त महामंत्री मनोज कोंडेकर यांना अध्यक्ष विवेक अल्लेवार यांनी सर्व पदाधिकारी समोर घोषित करण्यात आले.
सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून द्विपजलीत करण्यात आले. तसेच भगवान विश्वकर्मा व संस्थापक देत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, करून अभिवादन करण्यात आले.
घुग्घुस येथील नवनियुक्त भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघाचे महामंत्री मनोज कोंडेकर यांची निवड करण्यात आले. तसेच लॉयड्स मेटल्स कामगार कर्मचारी स्थायी, अस्थायी मित्रांनी पुष्पगुच्छ देवुन सत्कार व अभिनंदन करण्यात आला. तसेच समो वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.



