घुग्घूस शहरातील सर्वात जुनी हिंदू स्मशानभूमीचे स्वच्छता व सौंदर्यकरण करा : राजुरेड्डी
सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर
घुग्घूस : शहरातील वर्धा नदीच्या बेलोरा घाटावर सर्वात जुनी हिंदू स्मशान भूमी आहे वेकोलीच्या वसाहतीत राहणाऱ्या हिंदू समाज बांधवाच्या या स्मशानभूमीची अवस्था अंत्यन्त बिकट झालेली आहे.
सर्वत्र काटेरी जंगली झाडं – झूडपे उगवली आहेत.
हिंदू समाजातील विशेषतः तेलगू भाषिक नागरिक आपल्या मृत कुटुंबियांना माती देतात दफनविधी करतात व अन्य नागरिक अग्नी देतात.
याठिकाणी तेलगू समाज बांधवाच्या मृत नातेवाईकांच्या अनेक कबरी असून त्या जंगलात गहाळ झाल्याने त्यांना आपल्या पूर्वजांच्या कबरीवर जाऊन प्रार्थना ही करता येत नाही तसेच मृत झालेल्या नातेवाईकांच्या अंत्यविधी करीता खड्डे करण्यासाठी ही जीव मुठीत घेऊन जावे लागतं याठिकाणी मोठ्या प्रमाणात विषारी जीव – जंतू असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोखा निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन देऊन सदर हिंदू स्मशानभूमीची पूर्णपणे स्वच्छता करून स्मशानभूमिला संरक्षक भिंत / कुंपण ( वॉल कंपाऊंड) निर्माण करून स्मशानभूमिचे सौंदर्यकरण करण्याची मागणी करण्यात आली आहेत.



