Home Breaking News • वरोऱ्यात शस्त्रानी वार करून युवकाचा केला खून • काही तासातच...

• वरोऱ्यात शस्त्रानी वार करून युवकाचा केला खून • काही तासातच वरोरा पोलिसांनी केली आरोपीला अटक

972

• वरोऱ्यात शस्त्रानी वार करून युवकाचा केला खून

• काही तासातच वरोरा पोलिसांनी केली आरोपीला अटक

सुवर्ण भारत खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : वरोऱ्यातील केसरी नंदन गणपती जवळ आरोपी अमोल नवघरे वय अंदाजे ३५ वर्ष रा.हनुमान वॉर्ड वरोरा ,व मृतक नितीन चुटे यांच्यात वाद झाला.तदनंतर मृतक हा साई मंगल कार्यालयाजवळ आला असता आरोपी त्याचे मागे येऊन शस्त्राने शरीरावर सफासफ वार करून गंभीर जखमी केले.जखमी अवस्थेत उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
सदर घटना ८ सप्टेंबर २०२५ ला रात्री ८.१५ चे दरम्यान घडली.
काही तासातच पोलिसांनी वणी रोडवर आरोपीला अटक करण्यात यश मिळविले.सदर कारवाई पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक भस्मे,पो का सोनोने,नवघरे,प्रशांत नागोसे यांनी केली आहे.