Home Breaking News • सहज सुचलंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! • अधिवक्ता...

• सहज सुचलंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! • अधिवक्ता मेघा धोटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

74

• सहज सुचलंच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

• अधिवक्ता मेघा धोटे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

चंद्रपूर- किरण घाटे

महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.या गृपच्या मुख्य मार्गदर्शिका अधिवक्ता मेघा धोटे यांना राजूरा येथील जेसीआय रायल्सच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला आहे..शिक्षकदिनी अधिवक्ता मेघा धोटे यांना वणी येथे ज्ञान बहुउद्देशीय शिक्षण विकास मंडळाच्या वतीने कर्तृत्ववान सन्मान महिला पुरस्कार देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले होते.
धोटे ह्या समाजसेविका मायाताई कोसरे यांच्या सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या एक मार्गदर्शिका असून त्या राजूरास्थित इन्फॅट जीजस् इंग्लिश पब्लिक हायस्कूल मध्ये शिक्षिका आहे.
गेल्या सात वर्षांपासून त्या सहज सुचलंमध्ये कार्यरत आहेत.नवोदित तरुणींना नेहमीच त्यांनी प्रेरणा व प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे.आज याच गृपच्या दहा तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत.त्यांना त्या आजही वेळोवेळी मार्गदर्शन करीत असल्याचे मायाताई कोसरे यांनी सांगितले.
साहित्यिक क्षेत्रातही अधिवक्ता मेघा धोटे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.त्यांना या क्षेत्रात देखील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे.पथ्रोडच्या
जेष्ठ लेखिका विजया भांगे यांच्या त्या जीवलग मैत्रीण आहे.
एकाच दिवशी दोन पुरस्कार अधिवक्ता मेघा धोटे यांना मिळाल्याबद्दल सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक सहसंयोजिका नलिनी आडपवार या शिवाय वास्तुविशारद शिवानी प्रमोद झाडे, किनवटच्या सुपरिचित रांगोळी आर्टीस्ट साक्षी वाडगूरे, कवयित्री शैला चिमड्यालवार, सेवानिवृत्त नायब तहसिलदार साधना धकाते, समाजसेविका रजनी रणदिवे, किरण साळवी, रजनी पोयाम, सीमा पाटील, विजया तत्वादी, ऐश्वर्या मांदाडे ,समाजसेविका चंदा कामडी, जेष्ठ साहित्यिक सविता कोट्टी, कवयित्री मंगल मिसाळ , संजीवनी धांडे, चैताली आतराम, अधिवक्ता सारिका टेंभरे , अंजली इटनकर अधिवक्ता अंजली गुंडावार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.