राजेश सावरकर यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार बहाल!
सुवर्ण भारत: किरण घाटे (विदर्भ विशेष प्रतिनीधी)
चंद्रपूर : विदर्भ तेली समाज महासंघ मूलचे तालुकाध्यक्ष तथा देवनील विद्यालय टेकाडी येथील अनुभवी मुख्याध्यापक राजेश सावरकर यांना जिल्हा आदर्श मुख्याध्यापक म्हणून सन्मानित करण्यात आले.
आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाने व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने हा पुरस्कार समारंभ व सत्कार सोहळा काल थाटात पार पडला.
विदर्भ तेली समाज महासंघाच्या एक जेष्ठ पदाधिकारी मीनाक्षी गुजरकर यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल सावरकर यांचे अभिनंदन केले आहे.



