Home Breaking News • हैद्राबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला S .T.‌‍ प्रवर्गात आरक्षण द्यावे !...

• हैद्राबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला S .T.‌‍ प्रवर्गात आरक्षण द्यावे ! • सकल बंजारा समाज आरक्षण चळवळ समितीची मागणी • मागणी मान्य न झाल्यास येत्या 25 सप्टेंबरला रस्ता रोको आंदोलन!

110

• हैद्राबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला S .T.‌‍ प्रवर्गात आरक्षण द्यावे !

• सकल बंजारा समाज आरक्षण चळवळ समितीची मागणी

• मागणी मान्य न झाल्यास येत्या 25 सप्टेंबरला रस्ता रोको आंदोलन!

चंद्रपूर : किरण घाटे

चंद्रपूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटनूसार मराठा समाजाला कुणबी मराठा समाज म्हणून आरक्षण दिले आहे.जर मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळत असेल तर त्याच हैदराबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती (एसटी) मध्ये समाविष्ट आहे. तरी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी ) प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे.बंजारा समाज अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी संघर्ष करीत आहे आमची संस्कृती, भाषा, आणि जीवनशैली ही आदिवासी जमातीशी जुळते त्यामुळे आम्हाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळणे हे न्योयाचित आहे.असे आज चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या मागणीची पूर्तता न झाल्यास येत्या 25 सप्टेंबरला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.निवेदन सादर करताना सकल बंजारा समाज आरक्षण चळवळ समितीचे विकास चव्हाण, बालाजी जाधव,अजय चव्हाण,करण चव्हाण,सुरज राठोड, राजकुमार चव्हाण,प्रविण चव्हाण, जगदीश चव्हाण, तुषार जाधव,जयपाल राठोड,किष्णा चव्हाण, दिनेश जाधव ,आकाश चव्हाण, अशोक राठोड राहूल चव्हाण,आदिं उपस्थित होते.