Home Breaking News • गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या धरणा आंदोलनात विदर्भातील अनेक आदिवासी बांधव उपस्थित !

• गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या धरणा आंदोलनात विदर्भातील अनेक आदिवासी बांधव उपस्थित !

56

• गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या
धरणा आंदोलनात विदर्भातील अनेक आदिवासी बांधव उपस्थित !

चंद्रपूर | किरण घाटे

गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने आज मंगळवार दि.१६ सप्टेंबरला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी ५ वाजेपर्यंत धरणा आंदोलन आयोजित करण्यात आले होते.
माता राणी हिराई आत्राम व शहीद बाबुराव शेडमाके यांचे स्मारक व पुतळे उभारण्यासह अन्य २० मागण्यांसाठी हे धरणा आंदोलन होते.
उपरोक्त मागण्यांकडे शासन व प्रशासनाने वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष केल्यामुळे आज धरणा आंदोलन करावे लागले असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. पार पडलेल्या धरणा आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों आदिवासी बांधव सहभागी झाले होते.विदर्भातील काही आदिवासी नेते देखील या आंदोलनासाठी चंद्रपूरात आले होते.त्यांनी आपल्या भाषणातून उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.
संध्याकाळी एका शिष्टमंडळाने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे एक लेखी निवेदन सादर केले.