Home Breaking News • येत्या १ फेब्रुवारीला गांगलवाडी टी पॉईंटवर भव्य चक्काजाम आंदोलन! •...

• येत्या १ फेब्रुवारीला गांगलवाडी टी पॉईंटवर भव्य चक्काजाम आंदोलन! • नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी व्हावे विनोद झोडगेंचे आवहान

59

• येत्या १ फेब्रुवारीला गांगलवाडी टी पॉईंटवर भव्य चक्काजाम आंदोलन!

• नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनात सहभागी व्हावे विनोद झोडगेंचे आवहान

चंद्रपूर : किरण घाटे

ग्रामीण भागातील गांगलवाडी ते व्याहाड रस्ता जलद गतीने पूर्ण करा, मेन रोडचे खड्डे त्वरित बुजवा, हायवा ट्रकने होणारी जड वाहतूक थांबवा, मुडझा ते गांगलवाडी रस्त्यावर नियमित पाणी मारा ,रोडवरील उडणाऱ्या धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांना नुकसान भरपाई मदत द्यावी, गांगलवाडी मूडझा आवळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना (ब्रह्मपुरी आगारातून) ब्रह्मपुरी ते मुडझा करिता बस फेऱ्या वाढवा या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्यांना घेऊन रविवार दि. १ फेब्रुवारी२०२६ ला दुपारी १२:०० वाजता गांगलवाडी टी पॉईंट जवळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका कौन्सिल ब्रह्मपुरीच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन आयोजीत केले आहे.
या परिसरातील समस्त नागरिक, शेतकरी,व शेतमजूर बांधवांनी बहुसंख्येंने उपस्थित राहून सदरहु आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन काँ. विनोद झोडगे यांनी एका पत्रकातून केले आहे.