Home Breaking News घुग्घुस येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

घुग्घुस येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

171

घुग्घुस येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

सुवर्ण भारत: पंकज रामटेके ( सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर)

घुग्घुस : आमदार किशोरभाऊ जोरगेवार जनसंपर्क कर्तव्य केंद्रात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी भारतातील स्त्री शिक्षणाच्या जननी, नारीशक्तीचे प्रतीक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला द्वीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात येत विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आ. किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या व नगरसेविका सौ. मीनाताई राजेश मोरपाका यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवून समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीचा मार्ग दाखविला. स्त्री शिक्षणाचा पाया घालून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी आयुष्यभर मोलाचे कार्य केले. त्यांचे जीवनचरित्र, कार्य आणि विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी आहेत.

या प्रसंगी भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, नगरसेविका मधुताई तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके, राजेश गिरडकर, आशिष गौरकर, प्रेम गंगाधरे, अनिल कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.