• बल्लारपूरमध्ये संविधान व लोकशाही बळकटीसाठी विशेष शिबिराचे आयोजन
• नगरसेवक सुमित डोहणे व नगरसेविका साजिया शेख यांच्या पुढाकाराने भव्य जनजागृती शिबिर
सुवर्ण भारत: वैभव मेश्राम
प्रतिनिधी, बल्लारपूर

बल्लारपूर : प्रभाग क्र. १० मध्ये नगरसेवक सुमित (गोलू) डोहणे तथा नगरसेविका साजिया शाहिद शेख यांच्या सौजन्याने संविधान उद्देशिका वाटप तसेच मतदार यादी विशेष गहन पुनर्निरीक्षण शिबिराचे आयोजन उत्साहात पार पडले. नागरिकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती आणि मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास नगर परिषद बल्लारपूरच्या नगराध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र (पापा भैया) आर्य, तहसीलदार रेणुका कोकाटे मॅडम, डॉ. अनिल वाढई, इंजि. राकेश सोमाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विविध प्रभागांतील बीएलओ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी आनंद रामटेके, प्रा. कांबळे सर, अनिल सुखदेवे, विनोद वाळके, संजय शेलकर, अशोक कांबळे, हेमंत मानकर, शेख करीम भाई, आनंद मेश्राम, जयंत दुर्गे, भारत बोम्मावार आणि फारुख भाई यांना संविधान उद्देशिकेचे वितरण करण्यात आले.
यासोबतच मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. नाव नोंदणी, दुरुस्ती आणि स्थलांतर प्रक्रियेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाहिद शेख, रितेश अलोने, लालू शेंडे, रोशन बोम्मावार, शुभम लभाने, गौरव नाडमवार, परीस महाजनवार, संस्कार सुखदेवे, यश देवगडे, आरिफ खान, नंदू पाल, रिक्की कैथवास, लड्डू निमगडे, पवन तोकलवार, गौरव मेश्राम, मनीष सिडाम, तरुण देवराव, अक्षय रिंगणे आणि इर्शाद भाई यांनी विशेष परिश्रम घेतले.


