■ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनभर न्यायाच्या हक्कासाठी लढले: सिध्दार्थ पथाडे
सुवर्ण भारत:किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)
आवारपुर(चंद्रपुर):भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनभर न्यायाच्या , हक्कासाठी झगडून न्याय मिळविला आणि समतेचा लढा लढतांनाच आपल्या लाखों अनुयायींना बौध्द धम्माची त्यांनी दीक्षा दिली. असे प्रतिपादन सिध्दार्थ पथाडे यांनी केले.
आवारपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या पुढाकाराने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला .त्याला आज 6 वर्षे पूर्ण होत आहे. या वर्धापन दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी रिपब्लिकन पार्टीचे जिल्ह्यातील मुख्य नेते तथा अध्यक्ष सिध्दार्थ पथाडे यांनी परमपुज्य डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले.
सदरहु वर्धापन दिनाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने करण्यात आले होते.
बाबासाहेबांची देशाप्रती आस्था व निष्ठा होती. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी त्यांचे योगदान शब्दापलीकडचे आहे.
समाजातील प्रत्येक घटकांच्या सामाजिक न्यायासाठी त्यांनी संघर्षच केला नाही तर तो न्याय मिळेपर्यंत ते सदैव झटले. या देशाच्या मातीत रूजलेला भगवान गौतम बुध्दांचा धम्म स्विकारून त्यांनी आपल्या महानतेचे दर्शन घडविले आहे. या महामानवांच्या मानवी हक्काच्या क्रांतीलढ्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा वारसा जोपासने व तो पुढे घेऊन जाणे हे नव्या पिढीचे लक्ष्य असले पाहिजे असे पथाडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले.
या प्रसंगी आवारपूरच्या सरपंच प्रियंका दिवे , गाडेगावच्या सरपंच गिता राजुरकर , स्मार्ट व्हिलेज बिबीचे उपसरपंच प्रा. आशिष देरकर , सांगोडाचे माजी सरपंच सचिन बोंडे , हिरापूरचे माजी सरपंच प्रमोद कोडापे , आवारपूरचे ग्रा.प.चे सदस्य विकास दिवे , सदस्या सुषमा पानघाटे , सदस्य सुरेश दिवे , माजी ग्रा.प.चे सदस्य शशिकांत दिवे , नांदा येथील माजी सदस्य अभय मुनोत , नांदाफाटा येथील काँग्रेसचे हारूण सिद्धिकी , कोरपना तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश लोखंडे , ह.भ.प. विठ्ठल डाखरे महाराज , गणेश घोडमारे , निराधार समितीचे अध्यक्ष उमेश राजुरकर ,नांदाचे माजी ग्रा .प .सदस्य चंद्रशेखर राउत , साथरीचे
रूषीजी वाघमारे , सागर बोरकर , नांदाफाटा डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष कणिष्क ताकसांडे , रविकुमार वाघमारे , गौतम भसारकर , किशोर डोंगरे ,सेवानिवृत्त शिक्षक माधवराव वाघमारे , तंटामुक्त अध्यक्ष सुरेश धोटे , विक्रम ताजने , रविदास करमरकर , विनोद राजुरकर , राहुल सोनटक्के ,लोकगायक सदानंद टिपले यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे अध्यक्ष गौतम धोटे , सचिव दर्शन बदरे , उपाध्यक्ष रमेश खाडे ,कोषाध्यक्ष प्रमोद चांदेकर उपस्थित होते.
विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला .