Home Breaking News • ‘स्याडा कोटसा भरते’ झाडीबोलीतील काव्यसंग्रहाचे प्रकाशन: कवी सुनील बावणे – निल

• ‘स्याडा कोटसा भरते’ झाडीबोलीतील काव्यसंग्रहाचे प्रकाशन: कवी सुनील बावणे – निल

44
Oplus_131072

• ‘स्याडा कोटसा भरते’ झाडीबोलीतील काव्यसंग्रहाचे प्रकाशन: कवी सुनील बावणे – निल

Oplus_131072

सुवर्ण भारत: किरण घाटे (विशेष प्रतिनिधी)

बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर ( मुळ वायगांव तु. ) येथील कवी, अवघ्या काही काळातच साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर आपल्या काव्य लेखनाने आणि सादरीकरणाने नावलौकीक कमावलेले कवी श्री सुनील बावणे – निल यांचा झाडीपट्टी भागातील झाडीबोली भाषेतील बहुचर्चित कवितासंग्रह ‘स्याडा कोठसा भारते’ हा काव्यसंग्रह वरोरा येथे संपन्न होणाऱ्या ३२ व्या झाडीबोली साहित्य संमेलनामध्ये दिनांक २८/१२/२०२४ रोज शनिवारला प्रकाशित होत आहे.
कवी सुनील बावणे – निल यांनी आजवरी अनेक साहित्य संस्थेच्या माध्यमातून आपल्या काव्य लेखन आणि काव्य सादरीकरणाने महाराष्ट्रभर नावलौकिक कमावलेला आहे. चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या चार जिल्ह्यात बोलली जाणारी आणि काहीसा भाग नागपूर वर्धा या जिल्ह्यात बोलली जाणारी झाडी बोलीभाषा वैभव , सौंदर्य , डोंगरदऱ्या ,शेतीमाती, बोलीत थोडासा हास्याचा स्पर्श असणाऱ्या कविता कवीच्या भावर्गभातून काव्यसंग्रहात मधून प्रकाशित करण्यात येत आहेत. या देशाचा कणा आवत्या शेतकरी तसेच कामगार ,झाडीपट्टीतील सौंदर्य, सामाजिकता येथील शेतीमाती, काम करण्याच्या पद्धती या कवितासंग्रहात अतिशय उत्तमरीत्या रेखाटण्यात आलेल्या आहेत अशी चर्चा साहित्य क्षेत्रातून येत आहे.
आधुनिक काळामध्ये साधारणतः सर्वच गोष्टींचे शिक्षण प्रशिक्षण आणि माहिती या आधारे प्रत्येक गोष्टी चालतात परंतु या देशाचा पालन पोषण करणारा पोशिंदा आवत्या शेतकरी दोन वेळच्या जेवणाची महत्त्वाची भूमिका निभावत असून त्यांचं हालकीचे जीवन आणि एवढं असूनही त्याला सहनशक्तीचं, शेतीमातीचे शिक्षण कुठून मिळते ही त्याची उपजात कला तो कशी काय पिढ्यानेपिढ्या सांभाळत आलेला आहे याचं मन चिंतन आणि भविष्यात होणारी लोकसंख्या वाढीचे परिणाम आणि भविष्यात होणारी उपासमार पाहता कवीला पण एक संदेश आपल्या लिखाणातून द्यावासा वाटतो की या आधुनिकीकरणांमध्ये पुढे दोन संजच्या घासांची वनवन तर होणार नाही ना याचीच एक मनात चिंता बाळगून, बाकीच्या शिक्षणासोबत समोर येणाऱ्या संकटाशी भूक मरीच्या संकटाशी समोर जाण्यासाठी शेतीमातीचा व्यवसाय करण्यासाठी त्याचा प्रशिक्षण घेण्यासाठी एक प्रकारच शाब्दिक आव्हान कवीने आपल्या पुस्तकातून केलेला आहे. तसेच निसर्ग, सामाजिक बदल यांचा सुद्धा विचार विनिमय व्हावा यासाठी याबद्दल काही आपल्या लिखाणातून काही संदेश देता येईल का हा परिपूर्ण प्रयत्न कवीने आपल्या लिखाणातून केलेला आहे.
तसेच _मी बोलू का ?’ ही भरीव भुमिका असलेला निर्भिडपणे बोलणारा कवितासंग्रह सुध्दा प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
कामगार, सामाजिक संघटन आणि साहित्य क्षेत्रात काम करताना कवी सुनील बावणे – निल यांना आलेल्या अनुभवातून त्यांच्या काव्य लेखनाची प्रचिती लवकरच साहित्य क्षेत्र, सामाजिक क्षेत्रात वावरणारे जाणकार मंडळी आणि रसिक मंडळी यांना येईलचं असे आवर्जून सांगण्यात येते आहे. त्यांच्या या दोन्ही काव्य संग्रहासाठी विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा… अभिनंदन देण्यात येत आहेत.