■ ज्ञानदिप गुरुकुल आधार आश्रमातील संतापजनक प्रकार!
■संस्थापक हर्षल मोरेंवर कठोर कारवाई करण्याची ब्रिरसा क्रांती दलची मागणी !
सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)
चंद्रपुर:नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदिप गुरुकुल आधार आश्रमात जो अल्पवयीन मुलींच्या बाबतीत संतापजनक प्रकार घडला. त्या संदर्भात संस्थेचे संस्थापक हर्षल मोरे यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अश्या आशयाची मागणी चंद्रपूर जिल्हा बिरसा क्रांती दलच्या वतीने आज गुरुवार दि.१डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्फत एक लेखी निवेदनातून करण्यात आली.या ज्ञानदिप गुरुकुल आधार आश्रमात गोरगरीब मुली राहात असून त्यांच्या गरीबीचा फायदा घेत तेथील एका मुलींवर अत्याचार झालेला आहे.तशी तक्रार ही दाखल करण्यात आलेली होती.दरम्यान या आश्रमात सहा मुलींवर अत्याचार झालेला असुन त्या पैकी पाच मुली ह्या अल्पवयीन असल्याचे पोलिस तपासात उघड झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.माहे ऑक्टोबर महिन्यात संस्था संचालक यांनी पिडीत मुलीला पाय दाबण्याचे बहानाने आपल्या खोलीत बोलावून तिचेवर बलात्कार केला .
त्या नंतर परत माहे नोव्हेंबर मध्ये त्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता त्या मुलीने थेट आश्रमातून पळ काढुन आपल्या सर्व नातेवाईकांजवळ आपबिती कथन केली .मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करीत या प्रकरणातील संस्था संचालक हर्षल मोरे यास ताब्यात घेतले असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदरहु प्रकरणातील आरोपीस कठोर शिक्षा करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा बिरसा क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री यांचे कडे जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे मार्फत एक निवेदन सादर केले .त्या वेळेस जिल्हाध्यक्ष अशोक उईके,मधूकर कोडापे ,राजेन्द्र धूर्वे,प्रिती मडावी ,रेखा कुमरे ,लता पोरेते ,निर्मल मेश्राम,शारदा मेश्राम व बिरसा क्रांती दलचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.