Home Breaking News Chandrapur@ city news चंद्रपूरात सफाई कामगारांचे साखळी उपोषण, जि.प. सिईओंच्या आश्वासनानंतर...

Chandrapur@ city news चंद्रपूरात सफाई कामगारांचे साखळी उपोषण, जि.प. सिईओंच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित !

163

Chandrapur@ city news

■ चंद्रपूरात सफाई कामगारांचे साखळी उपोषण, जि.प. सिईओंच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित !

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंन्द्रपुर:आपल्या रास्त मागण्या साठी गेल्या तीन दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्र सफाई कामगारांचे साखळी उपोषण येथील जिल्हा परिषद प्रवेश व्दारा जवळ सुरू होते . काल बुधवारी संध्याकाळी ७ वाजता चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व उपोषण कर्त्यांना आपल्या दालनात चर्चे साठी बोलाविले .

दरम्यान त्यांनी त्यांना त्यांचे मागण्या सोडविण्या संदर्भात आश्वासन दिल्याने सफाई कामगारांनी सुरु असलेल्या या उपोषणाला स्थगिती दिली आहे.एका आठवड्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे समक्ष बैठक लावण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना काल सांगितले.असे सुर्या अडबाले यांनी आज या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

उपरोक्त साखळी उपोषण स्वाभिमानी शेतकरी संघटना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सफाई कामगारांनी जि.प .समोर सुरु केले होते.