Home Breaking News Chandrapur taluka news नेवसपरत एकदा सामाजिक कार्यकर्ता मनोज ठेंगणे यांनी जपली...

Chandrapur taluka news नेवसपरत एकदा सामाजिक कार्यकर्ता मनोज ठेंगणे यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

101

Chandrapur taluka news

■ नेवसपरत एकदा सामाजिक कार्यकर्ता मनोज ठेंगणे यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

सुवर्ण भारत:किरण घाटे(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपुर:चंद्रपूर जिल्ह्यात सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्ता माजी सैनिक मनोज वसंत ठेंगणे यांनी दिनांक ०५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत एका जखमी अवस्थेत असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला मदतीचा हात दिला आहे.

सदरहु घटना ही चंद्रपूर शहरा लगत असलेल्या पडोली या परिसरातील असून सदरहु व्यक्ती हा गेल्या चार दिवसांपासून पडोली भागात जखमी अवस्थेत आढळून आला होता.

त्यानंतर त्याची गंभीर परिस्थिती बघताच All Relegion Youth Foundationचे कार्यकर्ते नितेश बानोत यांनी भ्रमनध्वनीवरून मनोज ठेंगणे यांना सदरहु जख्मी अवस्थेत असलेल्या व्यक्तीची माहिती दिली.
वेळेचा विलंब न लावता मनोज ठेंगणे यांनी घटनास्थळ गाठत त्या व्यक्तीचा शोध घेतला .नंतर ठेंगणे यांनी त्या जख्मी व्यक्तीला स्नान करायची व्यवस्था करून देत त्यास नविन कपडे पुरविले.काही वेळातच All Relegion Youth .Foundationचे नितेश बानोत आणि टीम घटनास्थळी पोहोचली .शेवटी सर्वांच्या सहकार्यातून त्यास उपचारार्थ ऐंबुलसमधून शासकीय रूग्णालयात हलविले.

… त्या व्यक्तीच्या जखमेवर डॉक्टर मंडळींनी उपचार केले. या .७०वर्षिय जख्मी व्यक्तीचे नाव मारोती मुन असून तो भद्रावती तालुक्यातील सुमठाना येथील मुळ रहिवाशी असल्याचे कळते . शासकीय रुग्णालयातील उपचारार्थ नंतर त्या व्यक्तीस त्याच्या निवासी स्थानी सुखरूप पोहोचवण्यात
आले.
असल्याची माहिती आज आमचे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी यांना मनोज ठेंगणे यांनी एका भेटी दरम्यान चंद्रपूर मुक्कामी दिली.

या कार्यात मनोज ठेंगणेंसह विक्की रेगेंटीवार ,युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते नितेश बानोत, प्रशांत दानव,ऋषिकेश नदीनरू व ज्योती एलायमेंट पडोलीचे कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे ठेंगणे यांनी बोलताना सांगितले.