Home Breaking News Korpna taluka news • ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव निमित्त • कोरपना शहरात कायदा...

Korpna taluka news • ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव निमित्त • कोरपना शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा सतर्क बंदोबस्त

88

Korpna taluka news
• ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव निमित्त
• कोरपना शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा सतर्क बंदोबस्त

सुवर्ण भारत: मनोज गोरे
प्रतिनिधी , चंद्रपूर

कोरपना: ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव या दोन्ही महत्त्वपूर्ण सणांच्या निमित्ताने कोरपना शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.उप विभागीय पोलीस अधिकारी जाधव सा. यांच्या मार्गदर्शनात कोरपना ठानेदार- दारासिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक – देवानंद केकन, पोलीस उपनिरीक्षक – प्रकाश राठोड,पोनी राजपूत सा. पो. उपनिरीक्षक केकन सा. पो उपनिरीक्षक राठोड सा. वाघ, डवरे, जायभाये,जाधव, पवार, व इतर यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फेरी काढली.ईद-ए-मिलाद व गणेशोत्सव सण एकत्रित आल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कोरपना शहरात पोलिसाचा रूट मार्च काढण्यात आला.या फेरीमध्ये बसस्थानक चौक, डॉ. आंबेडकर चौक, राजीव गांधी चौक मेन मार्केट आणि शहरातील वस्ती या भागांना प्राधान्य देण्यात आले.

        सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच पोलीस स्टेशनमधील शस्त्र, दारुगोळा, ढाल-लाठी, हेल्मेट इत्यादींची पाहणी करून सर्वकाही सुरक्षित असल्याची खात्री करण्यात आली.
या फेरीमध्ये पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार,कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस प्रशासन या दोन्ही सणांना शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील असून, नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.