Chandrapur city@ news
•आगीत जळालेल्या दुकाणांना आ.किशोर जोरगेवारांची भेट !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथील जामा मस्जिद समोर असलेल्या अल – रजा कॉम्प्लेक्स मधील इस्लामीक बुक हाउस व तसेच कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी जळलेल्या दुकानांची पाहणी करुन आगी मागचे कारणाची माहिती जाणून घेतली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूस युवा नेते इमरान खान, स्वप्नील वाढई, नागेश तुराणकर, राजू नातर, राजू सूर्यवंशी, आकाश चिलका, मयूर कलवल, विक्की सोदारी, भोंगडे आदींची उपस्थिती होती.
मंगळवारी रात्रीच्या वेळेस दुकाणांना आग लागल्याची घटना घडली होती. काही तासाच्या परिश्रमा नंतर सदरहु आगीवर नियत्रंण मिळविण्यात यश आले होते मात्र तो पर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. या आगीत जवळपास पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. उपरोक्त घटनेची माहिती मिळाल्या नंतर चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी घुग्घूस येथे जळालेल्या दुकानाची आज पाहणी केली. या भेटी दरम्यान त्यांनी दुकान मालकां सोबत सविस्तर चर्चा करुन आगी मागचे कारण समजून घेतले. शॉट सर्किटमुळे सदरहु आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे.