Home Breaking News Ballarpur city@ news • अमृत ​​भारत स्थानक योजने अंतर्गत बल्लारपूर रेल्वे स्टेशन...

Ballarpur city@ news • अमृत ​​भारत स्थानक योजने अंतर्गत बल्लारपूर रेल्वे स्टेशन ची निवड • ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते थेट उद्घाटन • जिल्ह्यातील तीन स्थानकांची निवड

226

Ballarpur city@ news
• अमृत ​​भारत स्थानक योजने अंतर्गत बल्लारपूर रेल्वे स्टेशन ची निवड

• ६ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या हस्ते थेट उद्घाटन

• जिल्ह्यातील तीन स्थानकांची निवड

बल्लारपूर :- रेल्वे स्थानकांच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजना मध्ये बल्लारपूर रेल्वे स्थानक ची निवड करण्यात आली आहे.
देशभरातील निवडलेल्या ५०८ स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या मुंबई झोनमध्ये ७६ स्थानके आहेत. त्यामध्ये नागपूर रेल्वे विभागातील १५ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या दिवशी 508 स्थानकांवर सकाळी 9.30 ते दुपारी 12 पर्यंत सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता थेट उद्घाटन करतील. या सर्व ठिकाणी स्थानिक खासदार, मंत्री आणि आमदारांना निमंत्रित करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे विभागातील नागपूर रेल्वे विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारशाह स्थानके आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागातील चांदा फोर्ट स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.
बल्लारशाह रेल्वे स्थानकात 34 कोटी, चंद्रपूर रेल्वे स्थानकात 28 कोटी आणि चांदा किल्ल्यात 25 कोटी खर्चाची विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत.
या तिन्ही स्थानकांमध्ये एस्केलेटर, स्लोब, फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म शेल्टर, मुख्य द्वार, पार्किंग एरिया, लिफ्ट टॉयलेट, प्रतिक्षालय , बगीचा सुशोभीकरण आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही निविदा प्रक्रियेत आहेत.
बल्लारशाह आणि चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, एनआरयूसीसी सदस्य अजय दुबे, तर चंद्रपुरात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहणार आहेत.
सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.