Home Breaking News Varora taluka News • आनंदवणातकौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम...

Varora taluka News • आनंदवणातकौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम • आनंदवनात कौशल्य विकास केंद्राची स्थापना होणार!

13

Varora taluka News
• आनंदवणातकौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम
• आनंदवनात कौशल्य विकास केंद्राची स्थापना होणार!

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर 
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा: महारोगी सेवा समिती वरोरा तथा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महारोगी सेवा समितीच्या कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र इमारतीचे भूमिपूजन 18 सप्टेंबर 2024 ला उद्योगमंत्री उदय सामंत, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांचे हस्ते पार पडले.
आनंदवनातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानीमहारोगी सेवा समिती आनंदवन चे सचिव डॉ. विकास आमटे, प्रमुख अतिथी उद्योगमंत्री उदय सामंत, वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, औद्योगिक विकास महामंडळाचे जाईन्ड सी ओ, जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी झेनीत चंद्रा, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते,रमेश राजूरकर आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलताना नामदार उदय सामंत म्हणाले कि, आनंदवनात नव्याने स्किल सेंटर एम आय डी सी मार्फत आणि शासनाचे वतीने होत आहे. इंडस्ट्रिज ला लागणाऱ्या कोर्सेस चे ट्रेंनींग याठिकाणी होणार आहे. दिव्यांग युवा -युवतीना स्वतःचे पायावर उभे होण्यास या सेंटर ची मदत मिळणार आहे. इंडस्ट्रीज आणण्यासाठी स्किल डेव्हलोपमेंट ची आवशकता आहे. स्किल सेंटर पासून सर्वांना प्रोत्साहन देण्याची संधी मिळेल. युवकांना नोकरीची संधी प्राप्त होणार आहे.आम्ही अनेक विकासात्मक कामे करीत असतो परंतु दहा हजार पटीने आनंदवनातील कार्यक्रमात मला आनंद वाटतो. राजकारणाचे पलीकडे जाऊन सामाजिक कार्यामध्ये जायचे असल्यास याच आनंदवनात यावे असे मला वाटते. राजकारणात नीट बोलायचे असल्यास आनंदवनात येऊन शिकावे, भूमिपूजनाची संधी मला दिली. परंतु उदघाटनाचीही संधी मला आणि मुनगंटीवारांना मिळावी आणि मिळेल अशी आशा मी बाळगतो आहे.देशातील दिव्यांगासाठी पहिले सेंटर असल्याचे नामदार उदय सामंत यांनी विचारमंचवरून आपले विचार व्यक्त केले आहे.

नामदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आनंदवनाचे कृष्ठारोग्यांशी हजारो वर्षाचे जन्माचे नाते आहेत. आनंदवनला जगातील कोणताही पुरस्कार दिला तर तो कमी पडेल एवढे मोठे काम आनंदवनचे आहे. एम आय डी सी आणि शासन यांनी आनंदवनचा गौरव वाढविला आहे. दिव्यांग बांधवाना उद्योगाशी जोडण्यात येणार आहे. ही अभिमानास्पद बाब आहे. असे विचार नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की नामदार उदय सामंत यांच्या वडिलांपासूनचे माझे संबंध आहे. आनंदवनाशी पु. ल. देशपांडे यांचे घानिष्ठ संबंध 1967 ते सोमनाथ ला आले. त्यांनी आनंदवनात येउन मित्रांगन काढले. त्याठिकाणी अंध, अपंग लोक आहेत स्वरांनंदनचे संचालक सदाशिवराव ताजने यांनी आज 3000 हजार प्रयोग देशभरात केले. आनंदवन ला मी वाईट जागा समजतो की कृष्ठारोग्यांचे विरोधात आज 119 कायदे आहेत. सव्वाकोटी कृष्ठरोगी आहेत त्यांचे विरोधी कायदे आहेत. पहिले कृष्ठारोगी कोकणातील होते. कृष्ठ रोग्याच्या वेदनेशी नाते नामदार उदय सामंत नी जोडले आहे. असे विचार डॉ. विकास आमटे यांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंदनच्या अंतर्गत व्यवस्थापक पल्लवी आमटे यांनी केले तर, संचालन संधी निकेतन अपंगाची कर्मशाळा अधीक्षक रवी नलगिंटवार यांनी केले. आभार एम आय डी सी अधिकाऱ्यांनी केले.