Home Breaking News Chandrapur dist@ news •चित्रकला स्पर्धेत ठरले अनुश्री पुनम व समीक्षा सन्मान चिन्हाचे...

Chandrapur dist@ news •चित्रकला स्पर्धेत ठरले अनुश्री पुनम व समीक्षा सन्मान चिन्हाचे मानकरी ! •चंदनखेड्यात पार पडली चित्रकला स्पर्धा !

157

Chandrapur dist@ news
•चित्रकला स्पर्धेत ठरले अनुश्री पुनम व समीक्षा सन्मान चिन्हाचे मानकरी !
•चंदनखेड्यात पार पडली चित्रकला स्पर्धा !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:नेहरू युवा केंद्र चंद्रपूर (युवा कार्यक्रम) आणि बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने जल शक्ती अभियान अंतर्गत ” कॅच द रेन ” या विषयावर चंदनखेडा येथील स्थानिक नेहरू विद्यालयात दि. १२ऑगस्टला आयोजित चित्रकला स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुश्री डोमाजी भागवत , दितीय क्रमांक पुनम सुनिल गोहने तर तृतीय क्रमांक समिक्षा शरद भागवत यांनी प्राप्त केला विजेत्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या वेळी गौरविण्यात आले.पाण्याचे महत्व समजून इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘कॅच द रेन ‘ या शीर्षका अंतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग,शोष खड्डा, वनराई बंधारा, शेततळे (हौद) इत्यादी संकल्पना तदवतचं पाण्याचे महत्त्व समजावे व पटावे या उद्दात हेतूने सदरहु चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदरहु चित्र ड्राईंग शीटवर तयार करण्याचे आवाहन आयोजकांनी केले होते.नेहरू युवा केंद्र चंद्रपूरचे जिल्हा युवा अधिकारी समशेर सुभेदार व राष्ट्रीय युवा स्वयंसेवक भद्रावतीचे माजी तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यांनी केले होते. या वेळी मुख्याध्यापक यशवंत पुनवटकर , चित्रकला शिक्षक नरेंद्र आस्कर, अविनाश लोणकर,श्याम जिकार,आरिफ शेख, भाऊराव मडावी आदिंची उपस्थिती होती.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गटाचे सदस्य कुणाल गुलाब ढोक व शौर्य क्रीडा मंडळाचे सदस्य प्रविण वसंता भरडे यांनी अथक परिश्रम घेतले.