Home Breaking News Bhadrawati taluka@news •विवेकानंद ज्ञानपीठाचे सचिव अमन टेमुर्डे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाध्यक्ष...

Bhadrawati taluka@news •विवेकानंद ज्ञानपीठाचे सचिव अमन टेमुर्डे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. शोभणे यांचा सत्कार

356

Bhadrawati taluka@news
•विवेकानंद ज्ञानपीठाचे सचिव अमन टेमुर्डे यांच्या हस्ते साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. शोभणे यांचा सत्कार

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होऊ घातलेले आहे. या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून नागपूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ.रविंद्र शोभणे यांची निवड झालेली आहे. हे औचित्य साधून विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे यांनी डॉ. शोभणे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी गोंडवाना विद्यापीठातील वाणिज्य भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. यशवंत घुमे व नागपूर येथील सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ. अजय कुलकर्णी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल टेमुर्डे यांनी नियोजित अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचा सत्कार केला. या भेटीत साहित्यविषयक विविध प्रकारच्या चर्चा झाल्या . यावेळी डॉ. शोभणे यांना महारोगी सेवा समिती वरोरा चे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित झालेला गौरव ग्रंथ भेट देण्यात आला.