Varora taluka@ news
•नगरपरिषदच्या हलगर्जीपणा मुळे पसरले घाणीचे साम्राज्य
•नगर परिषद स्वच्छता समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात : बंडू लभाने (सामाजिक कार्यकर्ता)
✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा
वरोरा : स्वच्छता सर्वेक्षणात महाराष्ट्रस्तरीय विशेष पुरस्कार मिळालेल्या नपा ने शहराची अवस्था बिकट केली आहे नपा स्वच्छता विभाग स्वत:ची इमारत स्वच्छ ठेवू शकत नाही. या इमारतीत जिन्याजवळ स्वच्छता नाही, खर्रा, पानाच्या पिचकाऱ्या उडवल्या असून इथेच स्वच्छते वर दुर्लक्ष करून स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवल्याचे चित्र नगर परिषद लोकांना दाखवत आहे.तर मग शहराच्या स्वच्छतेची अपेक्षा नगर पालिके कडे कशी करायची हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.. प्रभाग क्र 1. मालवीय वॉर्डात अनेक महिन्यांपासून नाल्यांची साफ सफाई झाली नाही. नाल्यांतून कचरा साफ होत नाही . कदाचीत साफ केलेल्या नाल्याचा कचरा दिवसेंदिवस रस्त्यावर पडून राहतात त्यामुळे या वार्डात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे . हा कचरा उचलण्याची व साफसफाई ची जबाबदारीही पालिका पार पाडत नसल्याने या प्रभागातील नागरिकांच्या राहणीमानाचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.या वार्डातील आर्थिक दुरबल बहुतांश लोकांच्या घरी शौचालय नसल्याने .
नगर पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात कचरा व दुर्घन्दी मुळे वापर करता येत नसल्याने या वार्डातील लोकं उघड्यावर जाण्यास बाध्य होत आहे ही समस्या गंभीर असल्याने नगर पालिका स्वच्छता कर्तव्यात हयगय करीत असल्याने जिल्हाधिकारी नगर पालिकेवर काय कारवाई करणार यावर जनतेचे लक्ष लागले आहे.या शौचालयात प्रवेश करताच दुर्गंधी व कचऱ्याचा सामना करावा लागतो. इथे दररोज स्वच्छता केली जात नसल्याने इथे कचऱ्याने सर्पदंशाची भीती असते. मालवीय वार्डात सुध्दा माणसचं राहतात आमच्यावर अन्याय का नगर पालिके मध्ये सुध्दा माणसंच काम करतात तर माणुसकीच्या नात्याने तरी आमची व्यथा समजून घ्यायला पाहिजे अशी भावना सामाजिक कार्यकर्ता बंडू लभाने यांनी व्यक्त केली त्याच बरोबर नगर पालिकेच्या प्रशासक व स्वच्छता निरीक्षक अधिकाऱ्यांनी 1 मिनिटं तरी या शौचालयात थांबून दाखवावे अशी अपील केली असून तात्काळ समस्या न सोडवल्यास आंदोलनाचा इशारा दिला असून या नगर पालिकेवर जिल्हाधिकारी काय कारवाई करतील या कडे जनतेचे लक्ष लागले आहे