Home Breaking News Varora taluka@ news •आंबेडकरी चळवळीतील खंदे समर्थक दशरथजी शेंडे यांचा जाहीर सत्कार

Varora taluka@ news •आंबेडकरी चळवळीतील खंदे समर्थक दशरथजी शेंडे यांचा जाहीर सत्कार

24

Varora taluka@ news
•आंबेडकरी चळवळीतील खंदे समर्थक दशरथजी शेंडे यांचा जाहीर सत्कार

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, चंद्रपुर

वरोरा (प्रती)नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था बोर्डा व बुद्धिजीवी कर्मचारी संघ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनाचे आयोजन दि.२६/११/२०२३ रोजी स्थळ जन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक वरोरा येथे करण्यात आले होते यामध्ये आंबेडकरी चळवळीतील खंदे समर्थक सामाजिक कार्यकर्ते म्हणुन ओळख असणारे दशरथ शेंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला सामाजिक, तसेच धार्मिक क्षेत्रात ते हीरहिरेने भाग घेत असुन नगर परिषदमध्ये कर्मचारी म्हणुन ते कार्यरतआहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तथागत बुद्ध व सर्व बहुजन उद्धारक महापुरुषांचे विचार बहुजन समाजात पोहोचवीण्याचे कार्य ते सातत्याने ते करीत आहेत शासकीय कर्मचारी असून सुद्धा निडरपणे समाजाप्रती आपली बांधिलकी जोपासण्याचे काम करीत आहेत या मूल्यवान अशा समाज कार्याची दखल घेत नागलोक बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था बोर्डा यांनी दखल घेतली असून या महान कार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून अविनाश मेश्राम पोलीस निरीक्षक शेगाव प्रमुख अतिथी बबनराव पुसाटे पोलीस निरीक्षक चंद्रपूर प्रमुख मार्गदर्शक गीत घोष प्रगतिशील साहित्यिक व विचारवंत वणी यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांची भाषण स्पर्धा ठेवण्यात आली होती विषय, भारतीय समाजापुढील ज्वलंत समस्या व त्यावर उपाय तसेच सदर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला.