Home Breaking News Gadchiroli dist@ news • गडचिरोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकचे धरणे आंदोलन!...

Gadchiroli dist@ news • गडचिरोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकचे धरणे आंदोलन! •जिल्ह्यातील हजारों आशा व गटप्रवर्तक महिला सहभागी! •आशा व गटप्रवर्तक महिलांना जीआर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार -कॉ. विनोद झोडगेंनी दिला शासनाला इशारा!

54

Gadchiroli dist@ news
• गडचिरोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर आयटकचे धरणे आंदोलन!
•जिल्ह्यातील हजारों आशा व गटप्रवर्तक महिला सहभागी!
•आशा व गटप्रवर्तक महिलांना जीआर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार -कॉ. विनोद झोडगेंनी दिला शासनाला इशारा!


✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

गडचिरोली:गट प्रवर्तक महिलांना दरमहा दहा हजार रुपये मानधन वाढ, दरमहा आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये , कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज या शिवाय आशा महिलांना दरमहा सात हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्याचा जीआर काढावा अन्यथा दि.12/1/2024 पासून हा बेमुदत राज्यव्यापी संप सुरूच राहील असा इशारा आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दि.11 जानेवारीला गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर आयोजित आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱी वर्गांच्या धरणे आंदोलनात बोलताना दिला
दरम्यान आज गडचिरोली
जिल्हा परिषद समोर आशा वर्कर व गटप्रवर्तक महिलांनी सरकारच्या विरोधात जोरदार नारेबाजी करत हल्लाबोल केला .त्यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देऊन दि. 12 जानेवारी पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला.या शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांचे वतीने सांगण्यात आले की दि. 29 डिसेंबर पासून ऑनलाईन कामावर सर्व आशा गटप्रवर्तक महिलांनी बहिष्कार घातलेला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यानीं ऑनलाईन कामाबाबत सक्ती करता कामा नये. अन्यथा त्या विरोधातही आंदोलन करण्यात येईल.
अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांनी दि.18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संप केलेला होता. यासंदर्भात आठ नोव्हेंबर रोजी सन्माननीय तडजोड झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासकीय आदेश अद्याप मिळालेले नाहीत. या बाबतीत दोन महिने झालेले आहेत. अद्याप महाराष्ट्र शासन काही निर्णय घेण्यास तयार नसल्याने महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक महिलांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध संतोष अधिक वाढत चाललेला आहे.
महाराष्ट्रात चार डिसेंबर पासून सुरू असलेल्या अंगणवाडी महिलांच्या संपाला देखील पाठिंबा देण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी या संपामध्ये उत्स्फूर्तंपणे सहभागी व्हावे असे आवाहन कॉ .देवराव चवळे यांनी केले आहे.आजच्या
आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक आयटकचे विनोद झोडगे ,आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ .देवराव चवळे, जिल्ह्याच्या सचिव सरिता नैताम ,संगीता मेश्राम,माया दिवटे,संगीता मामिडवार,चंदा लोखंडे,सोनाली ठाकरे,लता नंदेश्वर , उमा समुद्रालवार,प्रज्ञा उपाध्ये आदिंनी केले .आंदोलनात जिल्हाभरातील हजारों आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी उपस्थित होते .दि.12 जानेवारी पासून बेमुदत संप व धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेच्या जिल्हा सचिव सरिता नैताम यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.