Home Breaking News chandrapur dist@ news • आठव्या दिवशीही चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद...

chandrapur dist@ news • आठव्या दिवशीही चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच ! • येत्या २४ जानेवारी पर्यंत निर्णय न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आशा व गट प्रवर्तक कर्मचारी महिलांचा निर्धार!

134

chandrapur dist@ news
• आठव्या दिवशीही चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरूच !

• येत्या २४ जानेवारी पर्यंत निर्णय न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा आशा व गट प्रवर्तक कर्मचारी महिलांचा निर्धार!

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत (पोर्टल न्यूज)

गेल्या काही दिवसांपासून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांकरिता बेमुदत संपावर आहेत . दरम्यान हा संप सुरू असताना आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट म्हणून २००० रुपये देण्यात येणार, या शिवाय आशा स्वंयसेवकांच्या मोबदल्यात ७०००रु. ची वाढ देण्याचा, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात १०००० रुपयांची वाढ देण्याचा, प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आज सादर करण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. आशा वर्कर, गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे लक्ष आता येत्या २४ जानेवारीच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलेले आहे आजच्या बेमुदत चाललेल्या धरणे आंदोलनातून महाराष्ट्र सरकारला आयटकच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की जर महाराष्ट्र सरकारने आशा , गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर संपूर्ण महाराष्ट्रातील अशा , गट प्रवर्तक कर्मचारी हे मुंबईच्या आझाद मैदान शिवाजी पार्क व इतर मैदानात बेमुदत धरणे आंदोलनाला बसतील .असे निवेदन देखिल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महिला व बाल विकास मंत्री, आरोग्य मंत्री, प्रधान सचिव आयुक्त यांना पाठविण्यात आले आहे.
8 व्या दिवशी आयटकचे राज्य सचिव काॅ . विनोद झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडों आशा , गट प्रवर्तक,अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी यांनी चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन सुरूच ठेवलेले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व कॉ.रविंद्र उमाटे, कॉ.प्रकाश रेड्डी, फर्जना शेख,निकीता नीर,सविता बोबडे,रेखा रामटेके,सविता गटलेवार,प्रमिला बावणे ,सखू खोके करीत आहे.