Home Breaking News Chandrapur city@ news • अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बेमुदत संपाचा आज...

Chandrapur city@ news • अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बेमुदत संपाचा आज 50 वा दिवस ! • वंचित बहुजन महिला आघाडीने दिला संपास पाठिंबा

202

Chandrapur city@ news
• अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या बेमुदत संपाचा आज 50 वा दिवस !
• वंचित बहुजन महिला आघाडीने दिला संपास पाठिंबा

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:राज्यभर सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटना व मदतनीस यांच्या बेमुदत संपाला काल गुरुवारी वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी येवून आपला पाठिंबा जाहीर केला आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे . चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संप ठिकाणी काल वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कविताताई गौरकार, अल्का मोटघरे, प्रतिभा तेलतुंबडे,प्रज्ञा ठमके, कल्पना जिवणे, पुष्पलता कोटांगले, नम्रता साव , रेखा पागळे, वैशाली वाघमारे,रेखा धानके , आशा बन्सोड आदिंनी भेट दिली.तदवतच त्यांनी एक लेखी पत्र देऊन संपास जाहीर पाठिंबा दिला आहे.आज या बेमुदत कामबंद आंदोलनाचा ५० दिवस असून यांच्या मागण्यांची शासनाने अद्याप दखल घेतली नाही.