Home Breaking News Chandrapur dist@ news • “त्या” वनकामगारांना सेवेत कायम करा ! •चंद्रपूर...

Chandrapur dist@ news • “त्या” वनकामगारांना सेवेत कायम करा ! •चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी घेतली दखल , दिले औरंगाबादच्या मुख्य वन संरक्षकांना पत्र! •दत्तात्रय समर्थ यांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

51

Chandrapur dist@ news
• “त्या” वनकामगारांना सेवेत कायम करा !
•चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी घेतली दखल , दिले औरंगाबादच्या मुख्य वन संरक्षकांना पत्र!
•दत्तात्रय समर्थ यांनी केली होती मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत (पोर्टल न्यूज)

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र पुसद येथे रोजंदारीवर कार्यरत असणाऱे वनकामगार रमाशंकर राममनोहर शुक्ला बाबू मधव शेळके, प्रकाश मैनाजी खंदारे, वामन महादू इंगोले, सिताराम गोपाळ राठोड,मोहन रतन राठोड व हरीभाऊ विठ्ठलराव पुजारी यांना सेवेत कायम करा अशी मागणी सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा औद्योगिक काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत एका लेखी निवेदनातुन केली होती.गेल्या अनेक वर्षांपासून हे वनकामगार वनविभागात कार्यरत असून त्यांच्या रास्त मागणी कडे आपण स्वतः लक्ष पुरवावे असे निवेदनात नमुद करण्यात आले होते.

सदरहु वनकामगार गेल्या चार दिवसांपासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते.या बाबत काल प्रजासत्ताक दिनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेत औरंगाबादचे मुख्य वनसंरक्षक यांचेकडे एक पत्र पाठवले त्यात त्यांना वनविभागात कायम करण्या बाबत शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवा असे नमुद करण्यात आले आहे.याच पत्राचे आधारे त्या आठ वनकामगारांनी आपले अन्नत्याग आंदोलन काल मागे घेतले आहे.या आंदोलनाला भुषण फुसे यांच्या सह , पुंडलिक गोठे, रविन्द्र उमाठे यांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता.