Gadchiroli dist@ news
• माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न
• प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक
एटापल्ली:तालुका मुख्यालयातील भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालय येथे माजी जि प अध्यक्ष तथा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न झाला.
तालुक्यातील आदिवासी विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी 1992 मध्ये येथे भगवंतराव आश्रम शाळेची स्थापना केली.10 वी आणि 12 वी चे शिक्षण झाल्यावर येथील गोरगरीब विध्यार्थ्यांना बाहेर जावे लागत होते.येथील विध्यार्थ्यांना तालुका मुख्यालयातच पुढील शिक्षण उपलब्ध व्हावं या उदात्त हेतून कला आणि विज्ञान महाविद्यालय सुद्धा सुरू केली.तालुक्यातील नामांकित महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
1992 ला लावलेलं छोटंसं रोपट्याचा आज वटवृक्ष झाले असून तालुक्यातील हजारो विध्यार्थी याठिकाणी घडले आहेत.उच्च शिक्षण घेऊन येथील आदिवासी विध्यार्थी आज विविध क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.एवढेच नव्हेतर येथील अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले आहेत.दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धेत येथील अनेक विद्यार्थी राज्य स्तरावर चमकतात.याही वर्षी अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केले असून 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न होताच भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते त्या विद्यार्थ्यांचा शॉल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ तसेच भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यात दिक्षा वाळके,गायत्री बुद्धावार,नीलिमा मेश्राम,मोनिका मडावी,सगुणा कंगाली आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी प स सभापती बेबीताई नरोटे,जेष्ठ नागरिक दत्तात्रय राजकोंडावार,पौर्णिमा श्रीरामवार, सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर,प्राचार्य डॉ बूटे,मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते.