Home Breaking News Gadchiroli dist @news • ताडपल्ली येथे उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचा...

Gadchiroli dist @news • ताडपल्ली येथे उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा •गावकऱ्यांच्या मागणीला यश…. •भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

96

Gadchiroli dist @news
• ताडपल्ली येथे उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा

•गावकऱ्यांच्या मागणीला यश….

•भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न

शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते भारताचे महान आदिवासी क्रांतिकारक आणि स्वातंत्रसैनिक होते.आपल्या गावात भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारण्यासाठी ताडपल्ली येथील आदिवासी बांधवांनी भाग्यश्री आत्राम यांच्याकडे मागणी केली होती.गावकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन तात्काळ पुतळा उभारण्यासाठी भाग्यश्री आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे.

नुकतेच ताईंनी गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली गाठून येथील भूमिया,गाव पाटील तसेच जेष्ठ नागरिकांशी चर्चा करत चक्क भूमिपूजन केले.लवकरच या कामाला सुरुवात होणार असून गावकऱ्यांची मागणी पूर्ण झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केला.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती बेबीताई नरोटे,संभाजी हिचामी,सामाजिक कार्यकर्ते जयराज हलगेकर, राकॉ चे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,भूमिया दुलसा नरोटे,गाव पाटील नामदेव कंगाली,कुटा रेणू कंगाली,दलसु तलांडे,अशोक नरोटे,रमेश मट्टामी,मादी नरोटे,रमेश कंगाली,देवाजी कंगाली,मधुकर कंगाली,धर्मा मट्टामी,लिंगा गोटा, सुधाकर नरोटी आदी गावकरी उपस्थित होते.