Home Breaking News chandrapur dist@ news • चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ व्या दिवशीही आयटकचे...

chandrapur dist@ news • चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ व्या दिवशीही आयटकचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच! • आशा व गटप्रवर्तक कर्मचारीगण येत्या ९ फेब्रूवारीला देणार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! • मानधन वाढीचा जी आर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे !

612

chandrapur dist@ news
• चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २५ व्या दिवशीही आयटकचे बेमुदत धरणे आंदोलन सुरूच!
• आशा व गटप्रवर्तक कर्मचारीगण
येत्या ९ फेब्रूवारीला देणार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
• मानधन वाढीचा जी आर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना घालणार साकडे !

चंद्रपूर :किरण घाटे

आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचारी संघटनेचा दि.१८आक्टोबर ते ९नोव्हेंबर पर्यंत राज्यव्यापी संप सुरू होता .तेव्हा सरकारने आशा वर्करला ७०००रूपये ,गट प्रवर्तकांना १०००० रूपये मानधन वाढ या शिवाय २००० रूपये दिवाळी बोनस लागू करण्याची घोषणा केली होती .परंतु दोन महिने उलटूनही जी आर न काढल्याने दि. १२ जानेवारी पासून राज्यभरातील सर्व आशा वर्कर गट प्रवर्तक कर्मचारी वर्गांनी बेमुदत संप पुकारला आहे त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे व जिल्हा कार्याधक्ष कॉ.रवींद्र उमाटे यांच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरूच आहे अनेकदा विविध मंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे .परंतु सरकारने जी आर काढला नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृति समितीची दि.५ फेब्रुवारीला रात्री आठ वाजता एक बैठक संपन्न झाली. या बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मानधन वाढीचा जी आर त्वरित काढण्यात यावा. याकरिता मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसा निमीत्त भेटून शुभेच्छा देऊन साकडे घालण्यासाठी येत्या ९ तारखेला ठाणे येथे जाण्याचा कृती समितीने एकमताने निर्णय घेतला असल्याचे विनोद झोडगे यांनी आज सांगितले.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री यांच्या ठाणे येथील यांच्या जनसंपर्क कार्यालयावर विशाल महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आयटकचे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे यांनी दिली आहे.