Nagbhid taluka@ news
• मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम मूळे ग्रामरोजगार सेवकांना नाहक त्रास.
✍️अरुण रामुजी भोले
सुवर्ण भारत:नागभिड तालुका प्रतिनिधी.
नागभीड:मनरेगाची कामे सुरळीत होतील असे उद्देश ठेऊन ग्रामीण भागात असलेल्या अनेक लोकांना काम मिळावे यासाठी पेपर हजेरी न लावता ऑनलाईन पद्धतीने मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये हजेरी घेण्यासाठी रोजगार सेवक यांच्या हस्ते करण्यात आली.परंतु थोडिजरी रेंज भटकली तर मस्टर ओपन होत नाही.त्यामुळे त्या कामावरील मजुरांच्या हजेरी लागत नाही. सकाळची हजेरी न लागल्यामुळे दुपारचे फोटो घेत नाही.परिणामतः मजुरांची मजुरी मिळत नाही.परत दुसऱ्या दिवशी पुन्हा परिस्थिती तीच राहिली तर ज्या ठिकाणावरून जिओ टॅग केलं आहे तिथंच सर्व मजुरांना हजेरी घेण्यासाठी यावे लागते.
काम परिसरात कोठेही असूद्या.नवीन नियमानुसार १० मीटर अंतर हे निश्चित झाले आहे.पण वेळ अल्प आहे. टाईम आऊट लवकर होत असल्याने हजेरी घेणाऱ्या रोजगार सेवकांना पुन्हा ॲप सुरुकरून मस्टर ओपन करा वे लागते.तेव्हा चार्जिंग उतरून जाते. ग्रामीण भागात कवरेज राहत नसल्याने जास्त अडचण निर्माण होत आहे.
दिवसभर साईट वर राहावे लागते .तेव्हा ग्रामीण भागाचा विकास आराखडा तयार करतांना यामध्ये प्रामुख्याने सुधारणा करावी.अशी ग्रामरोजगार सेवक संघटनेची मागणी आहे.असे संघटनेचे सचिव यशवंत निकुरें यांनी कळविले आहे.