Home Breaking News Nagbhid taluka@ news • शालेय स्पर्धेत ट्विकंल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची राज्य...

Nagbhid taluka@ news • शालेय स्पर्धेत ट्विकंल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड

322

Nagbhid taluka@ news
• शालेय स्पर्धेत ट्विकंल इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड

✍️अरुण रामुजी भोले
सुवर्ण भारत:नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड:नुकतीच पार पडलेली क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय भंडारा व भंडारा जिल्हा आष्टेडू आखाडा आणि आखाडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धा 8 फरवरी 2024 ला घेण्यात आली यामध्ये नागपूर गोंदिया ,भंडारा ,चंद्रपूर गडचिरोली, वर्धा ,इत्यादी जिल्ह्यांचा सहभाग होता यामध्ये ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत नेत्रदीप कामगिरी केली, यामध्ये वयोगट 14 मध्ये , हस्तकला ,या कलेत जानवी मसराम , वयोगट 17 मध्ये अर्पिता जीवतोडे ,कृष्णा गायकवाड ,अजित मळावी, खुशाल गुडघे, रोहिणी गरमळे, तनुश्री येकुडे, यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावले, तसेच पदसंतुलन, या कलेमध्ये सोनाली जांभुळे, निखिल वेलादी, यांनी प्रथम क्रमांक पटकावले ,तसेच 17 वर्षाखालील जिजाऊ ढाल मर्दानी कलांमध्ये, साक्षी गायकवाड, हिने प्रथम क्रमांक पटकावले या सर्व विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर निवड करण्यात आली, या सर्व विद्यार्थ्यांनी स्कूलचे अध्यक्ष , गणेश तर्वेकर , सचिव अजय काबरा, स्कूलच्या प्राचार्य- शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका- संगीता नारनवरे, स्कूलचे शारीरिक शिक्षक, महेश जिभकाटे ,गणेश लांजेवार ,रूपा ताडूरवार ,तसेच सर्व शिक्षक वृंद याना दिले