Home Breaking News Chandrapur city@ news • प्रेम जरपोतवार चंद्रपूर रत्न पुरस्काराने सन्मानित •पार्थशर...

Chandrapur city@ news • प्रेम जरपोतवार चंद्रपूर रत्न पुरस्काराने सन्मानित •पार्थशर समाचारच्या तिसऱ्या वर्धापन दिनी पुरस्कार वितरण

15

Chandrapur city@ news
• प्रेम जरपोतवार चंद्रपूर रत्न पुरस्काराने सन्मानित

•पार्थशर समाचारच्या तिसऱ्या वर्धापन दिनी पुरस्कार वितरण

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

चंद्रपूर: सामाजिक बांधिलकी जोपासत,सामाजिक कार्य करणारा जुनोना येथील प्रेम नामदेव जरपोतवार यांना चंद्रपूर रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रेम जरपोतवार याने जुनोना गावात “अभ्यासवर्ग-शाळे नंतरची शाळा” उपक्रम सुरु करून विद्यार्थांना शिक्षणाचे धडे दिले. कोरोना काळात जनजागृती, विद्यार्थ्यासाठी अभ्यास वर्ग, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम, ग्रामस्वछता, शासनाच्या विविध योजनाची जनजागृती, वृक्षारोपण, महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबीर, रक्तदान, तसेच विविध नामांकित संस्थांमध्ये स्वयंसेवक म्हूणन कार्य केले होते. नेहमी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन त्यांनी कार्य केलेले आहेत. याच कार्याबद्दल प्रेमला सामाजिक कार्यासाठी शिक्षणप्रेमी पुरस्कार, आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार , महाविद्यालयाच्या वतीने देण्यात येणार मिस्टर एसआरएम पुरस्कार मिळाला आहे.इतकेच नाही तर २०२३ च्या राज्यस्तरीय युवा संसद मध्ये मुंबई येथे चंद्रपूर जिल्ह्याचे आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे प्रतिनिधित्व केले आहेत. सध्या कलाम फॉउंडेशन, चंद्रपूर या नावाने संस्था स्थापन झाली असून त्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे.

याच सामाजिक कार्याची दखल घेऊन विदर्भातील प्रसिद्ध पार्थशर समाचारच्या वतीने २०२४ या वर्षीचा चंद्रपूर रत्न पुरस्काराने प्रेम जरपोतवार यांना सन्मानित करण्यात आले. पार्थशर समाचारच्या तिसऱ्या वर्धापन दिनी एनडी हॉटेल, चंद्रपूर येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

प्रेमने आपल्या यशाचे श्रेय आई, वडील, बहीण,भाऊ,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री कापसे, प्रा. डॉ किरणकुमार मनुरे,सर्व प्राध्यापक वृंद,कलाम फॉउंडेशनचे सदस्य, गावकरी यांना दिले आहेत.