Chandrapur city@ news
• चंद्रपूरचा असा ही एक अवलिया दिव्यांग निलेश पाझारे
•पार्थशर समाचार कडून रत्न पुरस्कारने सन्मानित
✍️ उज्वला निमगडे
सुवर्ण भारत:,चंद्रपूर(दुर्गापूर) प्रतिनिधी
चंद्रपूर:एखादे ध्येय उराशी बाळगूण त्यासाठी झपाटल्यागत कार्य करणारे,कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी त्यावर मात करून निस्वार्थीपणे वाटचाल करणारे आजच्या काळात फारच दुर्बलतेनेच आढळतात. त्यातही स्वतः दिव्यांग असून एखाद्या स्वस्थ व्यक्तीला सुद्धा लाजवेल अशा रितीने कृतीशील जीवन जगणारा एक अवलिया प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजेच चंद्रपूरचा निलेश स्मिता योगेश पाझारे !
१६ जानेवारी २००७ ला एका भीषण अपघातात एक पाय गमावला, त्यात दुसऱ्या पायालासुद्धा बरेच जखमा झाल्या होत्या . यातुन स्वतःला सावरण्यासाठी व स्वतःच्या पायावर चालायला किमान १-२ वर्ष लागेल अशी अवस्था होती. पण या अपघात मधून स्वतःला सावरत व स्वतःच्या पायावर उभे राहून चालायचे या जिद्दीमुळे तो अवघ्या ४ महिन्यांतच वाॅकर घेवून चालु लागला. स्वतः दिव्यांग होण्याच्या अगोदर बाबा आमटे यांचे कार्य पाहून दिव्यांग समुदायासाठी कार्य करायची आवड होती. समाजासाठी आपले काहीतरी देणे आहे हे निलेशला त्याच्या आई-वडील कडून वारसा मिळाला आहे. निलेशच्या तोंडून नेहमी जन्मदात्या आई-वडीलांचे नांव निघत असते वेळप्रसंगी तो त्यांच्या कार्याचं उदाहरण देखिल देत असतो.
हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून दिव्यांग समुदायसाठी निलेशने काम करणे सुरु केले. दिव्यांगाला दिव्यांग प्रमाणपत्र तयार करून देणे, बस-रेल्वे सवलत करून देणे, दिव्यांगासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनाची माहिती देणे, स्थानिक स्वराज्य संस्थेत कोणत्या योजना राबिल्या जातात याची माहिती देणे. शासनाने किंवा सामाजिक संस्थानाने दिव्यांग साठी काही शिबीर, मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन केले असेल तर ती माहिती जिल्ह्यातील दिव्यांगबांधवा पर्यंत नचुकता पोहोचविणे. दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून नाविन्य पूर्ण योजना तयार करून राबविता येणार का या साठी सत्याताने पाठपुरावा करत राहून त्या योजना राबविणे. याचा सकारात्मक परिणाम हा आहे कि संपूर्ण महाराष्ट्रात दिव्यांग समुदाय साठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक स्वयंरोजगाराच्या योजना राबविल्या जातात.
अपघातात आलेल्या दिव्यांगत्वाचे दुःख कुरवडत बसण्यापेक्षा त्यावर प्रखर व दुर्दम्य अशा इच्छा शक्तीच्या बळावर हावी होऊन समाजातील हतबल व आनंदी जगण्याचा बळ गमावून बसलेल्या दिव्यांग बांधवांसाठी निलेशचे कार्य एखाद्या दिपस्तंभसारखे प्रेरणादायी आहे. याचीच दाखल घेत पार्थशर समाचार चंद्रपूर यांच्या तर्फे २०२४ चे चंद्रपूर रत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आपल्या निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून समाजाच्या विशेषता दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या हुरहुन्नरी अवलिया व्यक्तिमत्वाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभकामना!
सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या वतीने निलेशचे अभिनंदन !
चंद्रपूर पार्थशर समाचारच्या वतीने निलेश पाझारे यास चंद्रपूर रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपच्या वतीने मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे, संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका नलिनी आडपवार, वैजयंती गहुकर, मंथना नन्नावरे, विजया तत्वादी, स्मिता बांडगे, रजनी रणदिवे,सरोज हिवरे, प्रियंका गायकवाड , वर्षा शेंडे, वर्षा कोंगरे, भावना मोडक, श्रूतिका नन्नावरे, संगिता पाटील, दीक्षा तेली, अदिती वानखडे, सोनाली इटनकर, चैताली आत्राम, कल्याणी सरोदे, अर्चना सुतार, सीमा पाटील श्रूति उरणकर, विजया भांगे, आदिंनी त्याचे अभिनंदन केले आहे.