Home Breaking News chandrapur city@ news •चंद्रपूर जिल्हा भाजपा ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर •जिल्हाध्यक्ष...

chandrapur city@ news •चंद्रपूर जिल्हा भाजपा ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर •जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा

53

chandrapur city@ news
•चंद्रपूर जिल्हा भाजपा ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर

•जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली घोषणा

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत: संपादक

चंद्रपूर : भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर हरीश शर्मा यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांची नावे जाहीर केली आहे. भाजपा जिल्हा चंद्रपूर ग्रामीण, महिला मोर्चा, युवा मोर्चा आणि विविध आघाडी प्रमुखांचा यात समावेश आहे.दर तीन वर्षांनी कार्यकारणीची नव्याने रचना केली जाते, त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे.

जिल्हा ग्रामीणच्या सरचिटणीस पदावर डॉ. मंगेश गुलवाडे, संध्याताई गुरनुले, ब्रीजभूषण पाझारे, राजू गायकवाड, विवेक बोढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनाताई शेंडे या भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा असतील. सरचिटणीस पदावर विजयाताई डोहे, नीलम सुरमवार, लक्ष्मीताई सागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर ग्रामीणचे महेश देवकते हे अध्यक्ष असतील. युवा मोर्चा सरचिटणीस पदावर श्रीनिवास जनगमवार, अमित गुंडावार, तनय देशकर, यश बांगडे यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा चंद्रपूर ग्रामीणच्या भाजपाच्या आघाडी प्रमुखांच्या नावांची घोषणा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी केली आहे. ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदी डॉ. अंकुश आगलावे यांची निवड करण्यात आली आहे. गौतम निमगडे हे अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष असतील. अनुसूचित जमाती आघाडीच्या अध्यक्षपदाची धुरा अरुण मडावी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. इमरान पठाण यांचे नाव अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदासाठी निवडण्यात आले आहे. बंडु गौरकार हे किसान आघाडीचे अध्यक्ष असतील.

नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंहजी चंदेल,माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड.संजय धोटे, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस , प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम,माजी आमदार जैनुद्दीन जव्‍हेरी, सुदर्शन निमकर, भाजपा नेते अशोक जीवतोड,भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, प्रमोद कडू, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, रमेश राजूरकर आदींनी अभिनंदन केले आहे.