Chandrapur dist@ news
• महिला वाहक कविता झाडेंवर झाली कारवाई!
• जेष्ठ नागरिकास बस मधून भररस्त्यात उतरविणे पडले महाग!
• सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठेंनी केली होती वरिष्ठांकडे तक्रार दाखल !
सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर -एका महिला बस कंडक्टरने वयोवृद्ध जेष्ठ नागरिकास चक्क बस मधून रस्त्यात उतरुन दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जेष्ठ नागरिकांत संतापाची लाट उसळली होती.शेणगांव ते चंद्रपूर या बसमधून पडोलीचे जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे हे खुद्द प्रवास करत होते .त्यांचे वय आधार कार्डवर ७६वर्षांचे असून देखील महिला वाहक कविता झाडे यांनी त्यांचे काही न ऐकता त्यांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसात भर रस्त्यात उतरून दिले होते.या बाबतीत सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर केली.त्यांनी सादर केलेल्या तक्रारीत बस चालक रोकडे व वाहक कविता झाडे हे दोघेही तेवढेच जबाबदार असल्याचे म्हटले होते.या तक्रारीची एक प्रत त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे दिली होती. उपरोक्त प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने विभागीय वाहतूक अधिकारी यांनी वाहन कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केल्याचे एका पत्रात म्हटले आहे.परंतू या कारवाईमुळे तक्रारकर्ते पुंडलिक गोठे हे पूर्णता समाधानी नाही.त्यांनी याच संदर्भात उद्या आपण नागपूर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करणार असल्याचे म्हटले आहे.वाहन चालक यांनी बस वाहक झोडे यांना मला बस मधून उतरविण्यासाठी अधिक प्रवृत्त केल्याच्या आरोप गोठे यांनी आज या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बोलताना केला आहे.