Home Breaking News Chandrapur city@news •गोल बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम जोरात! • छोट्या व्यापारी...

Chandrapur city@news •गोल बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम जोरात! • छोट्या व्यापारी वर्गात उमटले नाराजीचे सुर !

380

Chandrapur city@news
•गोल बाजारातील अतिक्रमण हटाव मोहीम जोरात!

• छोट्या व्यापारी वर्गात उमटले नाराजीचे सुर !

सुवर्ण भारत:किरण घाटे

चंद्रपूर – शहरातील मनपाने गेल्या काही दिवसांपासून शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असून बुधवारी सकाळी चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या स्थानिक गोलबाजारातील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली असल्याचे चित्र आज प्रत्यक्षात दिसून आले.गेल्या काही वर्षांपासून शहरासोबतच गोलबाजारात मोठ्या प्रमाणात व्यापारी बंधूंचे अतिक्रमण वाढले होते.मनपाकडे या संदर्भात वारंवार जनतेच्या तक्रारी देखील होत होत्या.सणासुदीच्या दिवसांत बाजारात जाण्यासाठी महिलांना बराच त्रास सहन करावा लागत होता.त्यातच गोलबाजारात दुचाकी वाहने गर्दीतून मार्ग काढत पुढे जात होती . रस्त्यावरील हातठेल्यांची संख्या झपाट्याने वाढली होती.या सर्व परिस्थितीचा मनपाने विचार करत शहरातील वाढलेले अतिक्रमण हटावण्याचा निर्णय घेतला.व ही मोहीम राबविण्यास पाऊल पुढे टाकले.आज सकाळी ११वाजेपासून स्थानिक गोलबाजारातील अतिक्रमण हटाविण्याची कारवाई सुरू झाली.ही कारवाई संध्याकाळला उशिरा पर्यंत सुरू होती . सदरहु कारवाईमुळे छोट्या व्यापारी वर्गात नाराजीचे सुर उमटल्याचे दिसले तर अनेकांनी मनपाच्या या मोहिमेचे स्वागत केले.परत या भागात अतिक्रमण होणार नाही.या साठी मनपा पथकाने विशेष लक्ष देणे गरजेचे राहणार आहे.