Home Breaking News Chandrapur city@ news • माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उच्च न्यायालयात दाखल...

Chandrapur city@ news • माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिके मधील कोर्टानी दिलेल्या आदेशानुसार ईरई व झरपट नदीच्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केले शपथपत्र

130

Chandrapur city@ news
• माजी खासदार नरेश पुगलिया यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिके मधील कोर्टानी दिलेल्या आदेशानुसार ईरई व झरपट नदीच्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दाखल केले शपथपत्र

चंद्रपूर- माजी खासदार नरेश पुगलिया यांनी इरई व झरपट नदी प्रदूषित होत असून नदीचे अस्तित्व संपुष्टात येत असल्याबाबत उच्च न्यायालयाच्या मुबई, खंडपीठात नागपूर येथे जनहित याचिका क. ४७/२०२२ दाखल केली आहे. जनहित याचिकेत चंद्रपूर जिल्हयातील इरई व झरपट नदीचे संवर्धन, संरक्षक भिंत, खोलीकरण व सौंदयीकरण करण्याबाबतची मागणी केली आहे. सदरहु जनहित याचीकेमध्ये जिल्हाधिकारी हे सुध्दा प्रतिवादी आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे.
जनहित याचिकेच्या माध्यमातून आम्हाला खात्री आहे की. आम्हाला उच्च न्यायाला कडून न्याय मिळेल. हा प्रश्न जनतेचा जिवाशी निगडीत असून जनतेला पिण्यासाठी लागणारे पाणी व इतर उपयोगी कामासाठी या दोन्ही नद्यांचे नाले होवू देणार नाही.
वेकोली कडून कोळसा उत्पादनानंतर प्रक्रियायुक्त पाणी व कचरा इरई नदीपात्रात सोडले जात असल्याच्या प्रकरणात चंद्रपूरचे जिल्हाधिका-यांना पाच आठवडयात प्रतिज्ञापत्र सादर करावे असा आदेश उच्च न्यायालय मुबई, नागपूर बैचचे न्यायमुर्ती नितीन साबरे व न्यायमुर्ती अभय मंत्री यांनी दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी उच्च न्यायालयाच्या मुबई, खंडपीठात नागपूर येथील जनहित याचीकेत दिनांक ०८/०५/२०२४ रोजी शपथपत्र दाखल करून ईरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षणास तसेच झालेल्या विद्रुपीकरणास वेकोली हेच जबाबदार असल्याचे नमूद केले आहे.
जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी त्यांचे लेखी उत्तर स्पष्टपणे नमूद केले आहे की, प‌द्मापूर वेस्टर्न कोल फिल्ड खाणीची पातळी ही ईरई नदीच्या बरोबरीने असल्यामुळे त्यातील वाळूमिश्रीत माती व गाळ हा ईरई नदीच्या पात्रात आली आहे. नदीचे रूपातंर नाल्यामध्ये होत आहे. तसेच भटाळी खाणीतील वाळू मिश्रीत माती ही मान्सून मधील अतिवृष्टी पावसामूळे नदीच्या पात्रात येते. परंतु वेकोली हे रोकण्याकरीता त्यात प्रतिबंध करण्याकरीता आवश्यक झाडाची लागवड करीत नाही. तसेच भटाळी येथील खाणीमध्ये कोळसाची साठवणूक करतात परंतू त्यामुळे होणा-या प्रदूषणास आळा करण्याकरीता पाणी मारने थांबविले आहे. तसेच वेकोलीच्या कोळसा वाहतूकीकडे व कोळसा साठवणूकीकरीता वापरण्यात येणा-या रोडवर अत्यल्प पाणीच्या फवारणी करीत असल्यामूळे वायू प्रदूषण झालेले आहे. तसेच हिंदूस्थान लालपेठ खाणीमूळे ईरई नदीचे पात्र उथळ झाले असल्यामुळे पावसाळयात (मान्सून सिझन) मध्ये चंद्रपूर शहरातील पाण्याचा प्रवाह सरळपणे होत नाही व पदमापूर पासून लालपेठ कॉलरी ते दुर्गापूर पर्यंत वेकोलीचे तयार झालेले मातीचे ढिगारे वेकोली मार्फत अतिजलदपणे काढणे आवश्यक आहे. वेकोलीने ढिगा-याच्या मातीचे उपाययोजना न केल्यामूळे
पावसाळ्यात ही माती थेट इरई व झरपट नदी मध्ये जात आहे. याला वेकोली जवाबदार असल्यामूळे यावर आताच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचा आलेल्या रिपोर्टनुसार त्यांनी लेखी उत्तर दाखल केले आहे. तसेच त्या रिर्पार्टच्या आधारे सबंधीत विभागाला वेकोलीमूळे होत असलेले प्रदूषण रोकण्याकरीता त्वरीत कार्यवाही करण्याचे कळविले आहे. यावरून हे स्पष्ट होते की, वरील बाबीमुळे वेकोली ही पूर्वतः जबाबदर आहे.
इरई व झरपट या दोन्ही नद्या चंद्रपूर शहरांच्या जिवनवाहीनी म्हणून उल्लेख करण्यात येतो. इरई नदी पासून अर्धा शहराला पिण्याचे पाणी व नदी काठच्या गावे जसे कि विचोळा, छोटा नागपूर, पडोली, कोसारा, दाताळा, देवाळा व इतर गावांसाठी पिण्याची पाण्याची नळयोजना सुध्दा आहे. इरई, झरपट नदी, रामाला तलाव यांच्या अस्तित्वामुळेच चंद्रपूर शहराला नळ योजनेचा माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जातो व घरोघरी असलेल्या बोरवेल करिता पाणी उपलब्ध होत आहे. जर पाणी देण्याचे ठिकाणच अदृश्य होत असेल तर याला जबाबदार वेकोली आहे. ही आता खात्री जिल्हाधिका-यांच्या कमिटी अहवालानुसार झाली आहे.
परंतू या दोन्ही नदी पात्राची खोली व रुंदी कमी झाली असून अतिवृष्टी जेव्हा-जेव्हा होते तेव्हा-तेव्हा चंद्रपूर शहराला पुराचा फटका बसतो व ही बाब पालकमंत्री, लोक प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर शहर महानगरपालिका, सिंचन विभाग, बांधकाम विभाग या सर्वांनी या दोन्ही नद्या कडे गार्भियाने लक्ष देणे गरजेचे आहे. भविष्यात चंद्रपूर शहराला मोठा पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे थातूरमातून उपायोजना न करता कायमस्वरूपी उपायोजना करणे गरजेचे आहे. १) इरई व झरपट नदी वर बंधारा २) दोन्ही नद्यांचे खोलीकरण ३) इरई नदीवर डाव्या व उजव्या तिरांवर संरक्षक भिंत व इतर विकासाची कामे करणे आवश्यक आहे. तसेच या दोन्ही नद्याची खोलीकरणची संपूर्ण जबाबदारी वेकोली मार्फत देण्यात यावे. व संरक्षक भिंत व इतर विकासाचे कामासाठी लागणारा निधी राज्यसरकार देत नसेल तर जिल्हा खनिज विकासातून हा निधी देण्यात यावा, पालकमंत्र्यांनी
आपल्या अधिकाराचा योग्य वापर करून या दोन्ही नद्यांचे संरक्षण करावे व कायमस्वरूपी योजना करून चंद्रपूर शहरातील भविष्यात होणारी पाणी टंचाई, व पुराचा फटका यापासून जनतेला दिलासा द्यावा.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे सोबत त्वरीत बैठक लावून सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य करावे. नागपूर शहरातील नाग नदी बाबत शहराला होणारा पूराचा धोका व नदी प्रदूषणामुळे त्या भागातील लोकांना होणारा त्रास या बाबत मा. उच्च न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे राज्य सरकार या योजनेला दिलेली मान्यता.
नाग नदीला प्रदूषण मुक्त व पुर मुक्त करण्याकरिता जनतेने व स्थानिक पत्रकारांच्या पुढाकाराने वरील प्रश्न मार्गी लागण्याचा प्रयत्नाला यश मिळू शकतो तर चंद्रपूर शहरातील इरई व झरपट नदीला मुक्त करून खोलीकरण, संरक्षक भिंत, बंधारा व सुशोभिकरण याला चंद्रपूरचे जागृत जनता वेळ पडल्यास आंदोलनाचा मार्ग स्विकारेल?असे माजी. खा.नरेश पुगलिया यांनी म्हटले आहे.