Home Breaking News Ballarpur City @News • वैद्यकीय समितीचे काशिनाथ सिंग ग्रामीण रुग्णालयाचा घेतला आढावा

Ballarpur City @News • वैद्यकीय समितीचे काशिनाथ सिंग ग्रामीण रुग्णालयाचा घेतला आढावा

175

Ballarpur City @News
• वैद्यकीय समितीचे काशिनाथ सिंग ग्रामीण रुग्णालयाचा घेतला आढावा

सुवर्ण भारत: शहर प्रतिनिधी,बल्लारपूर

बल्लारपूर :- जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार आज जिल्हा वैद्यकीय समितीचे सदस्य काशिनाथ सिंह यांनी ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.गजानन मेश्राम यांची भेट घेतली.
ग्रामीण रुग्णालय व्यवस्थेबद्दल काशिनाथ सिंह यांनी आधीच्या बैठकीत डॉ. गजानन मेश्राम यांनी काही सूचना केल्या होत्या. रुग्णालयात काही वैद्यकीय मशीन्सची आवश्यकता होती, ज्याची माहिती काशिनाथ सिंह यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सांगितले, त्यानंतर पालकमंत्री यांच्या माध्यमातून आधुनिक सोनोग्राफी मशीन व ईसीजी मशिन उपलब्ध झाल्यामुळे तेथील परिस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून आले. पावसाळ्यात रुग्णाची संख्या लक्षणीयरीत्या वाढते, त्यादृष्टीनेही जवळपास सर्वच आजारांची औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन मेश्राम यांनी बैठकीत सांगितले. तसेच ड्रेनेज चोकअपच्या माध्यमातून इकडे तिकडे जाणारे पाणी पुनर्संचयित करून त्याचा पुनर्वापर करून तेथील झाडांना व बागांना पाणी देण्यासाठी वापर करण्याचा प्रस्ताव आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत मिळालेल्या मशिन्सबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले व मशिनच्या माध्यमातून लोकांना उपचार करताना खूप सुविधा मिळत असल्याचे दिसून आले. येत्या काळात या रुग्णालयाला स्मार्ट रुग्णालय बनवण्यात येणार असून त्यावर काम सुरू होणार आहे. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग चे अभियंता वैभव जोशी उपस्थित होते.