Chandrapur city@ news
• मनपाचा दुर्लक्षपणा- ठिक ठिकाणी खोदले खड्डे, काम ठप्प: अपघात होताच मनपा प्रशासन झाले खडबडून जागे!
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील ऐन मुख्य रस्त्याच्या बाजूला मनपाने खड्डे खोदून ठेवल्यामुळे काल रात्री एक अपघात झाला त्यात एका जणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.ही घटना रात्रीच्या वेळेस शहीद भगतसिंग चौकात घडली. स्थानिक पठाणपुरा मुख्य मार्गावरील शहीद भगतसिंग चौकातील नालीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ साचला आहे.त्यामुळे नालीतील पाणी जाण्याचा मार्ग बंद पडला आहे.हा गाळ व कचरा साफ करण्यासाठी मनपाच्या कामगारांनी तेथे मोठे खड्डे करून ठेवले आहेत.काल याच ठिकाणी एक अपघात झाला.लोकांची ओरड झाली. त्यानंतर आज मनपाचे आठ दहा कामगार घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी कामाला सुरुवात केली.
याच मार्गावरील दोन ते तीन ठिकाणी गटार लाईनचे खोदकाम करण्यात आले .सात ते आठ दिवसांपासून काम होऊन देखील महानगर पालिकेचा बांधकाम विभागाने त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे चेंबर किंवा झाकण बनविले नाही, बऱ्याच ठिकाणचे मेन रोड वरील गटराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे काल त्याच ठिकाणी दोन नागरिक गाडी घेऊन पडले त्यात एका व्यक्तीच्या डोक्याला मार लागला .यास महानगर पालिकाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे.