Home Breaking News Varora city @news •वरोरा शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा व बांधकाम समस्याचे निवारण...

Varora city @news •वरोरा शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा व बांधकाम समस्याचे निवारण करा •अन्यथा नागपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलन करू, माजी सभापती छोटू भाई शेख यांचा इशारा.

30

Varora city @news

•वरोरा शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा व बांधकाम समस्याचे निवारण करा

•अन्यथा नागपरिषद प्रशासनाविरोधात आंदोलन करू, माजी सभापती छोटू भाई शेख यांचा इशारा.

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर

वरोरा :- वरोरा नगरपरिषद नगरसेवक पदाधिकाऱ्यांचे कार्यकाल संपून अडीच ते तीन वर्षे पूर्ण झाले
असून शहरात अनेक समस्या निर्माण झाले आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे निवडणुका होत नसल्याने
शहरातील 60 हजार नागरिकांना अनेक अडचणीचा सामना जाव लागत आहे, याला जबाबदार शासन व प्रशासन असून यांच्या चुकीच्या धोरणामुळे स्वच्छते व इतर विकास कामाकरिता 14 व 15 वित्त आयोग निधी शासनाकडून नगरपरिषदेला तीन वर्षे लोटून मिळाला नाही व इतर निधी सुद्धा नाही च्या व्यतिरिक्त मिळाल्यामुळे स्वच्छता व अनेक विकास कामाकरिता प्रशासनाला अडचण येत असल्याचे या वरून दिसून येत आहे
यामध्ये १) मागील 3 वर्षापासून घंटागाडी चे काम देण्यात
आलेले नाही
नाली सफाई करणाऱ्या नाहीच्या व्यतिरिक्त कामगारांकडून अपुरे काम करून घेतलं जात आहे
शहरात जवळपास 14 ते15 हजार टॅक्स धारक असून त्यांच्या येथील कचरा दररोज घंटागाडी उचलण्याकरिता नागरिकांवर घंटागाडी कर लावण्यात आला असून 60 ते 65 लाख रुपये कर दरवर्षी नागरिकाकडून वसूल केल्या जाते आणि एक दिवस आड घंटागाडी पाठवून नागरिकांची आर्थिक लूट प्रशासन शासनाच्या चुकी धोरण मुळे करीत आहे एक तर नेहमीच घंटागाडी पाठविण्यात यावी नाहीतर कर अर्धा भरायला लावण्यात यावा
2 मागील 2 ते 3 वर्षापासून प्रलंबित असलेले घरकुल चे प्रकरण मार्गी लावून गोरगरीब नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावे
3) शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्याकरिता सर्व प्रभागात नाल्यांमध्ये कीटकनाशक औषधीचे फवारणी करून फॉगिंग मशीन द्वारा दुप्पट करण्यात यावे
4) आनंदवन व मोहबाळा कडून शहरात येत असलेले सांडपाण्यामुळे नागरिकांच्या रहदारीस अडचण व नागरिकांच्या घरात पाणी घुसून नुकसान होत आहे तरी सदर येणारे सांडपाणी शहराबाहेरून काढण्यात यावे
४) शहरातील मुख्य चौक व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बसून असलेल्या मोकाट जनावरामुळे सतत अपघात होऊन रहदारीस अडचण निर्माण होत आहे तरी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून ठेकेदारावर कार्यवाही करण्यात यावी
५) शहरातील सर्व प्रभाग महिन्यातून नाल्या सफाई दोन वेळा करण्यात याव्या
6) 2 वर्षांपूर्वी शहरातील सर्व प्रभागात 60 ते 80 स्ट्रीट लाईटचे विद्युत पोल लाखो रुपये खर्च करून उभे करण्यात आले असून त्यांच्यावर आतापर्यंत सुद्धा स्ट्रीट लाईट लावण्यात आले नाही तरी नागरिकांच्या सुविधे करिता लवकर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे
7) मागील 1ते 2 वर्षांत शहरातील विविध विकास कामे ठेकेदारांनी निष्कृष्ट दर्जाचे केले असल्याने अशा कामाची चौकशी करून त्यांचे १०% सेक्युरिटी डिपॉझिट जप्त करून न पंडात रक्कम जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी
8 शहरातील एक वर्ष पासून ठेकेदाराने घेतलेले विविध विकास काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करून काम तातडीने सुरुवात करण्यात यावे 9) शहरातील सर्व प्रभागातील प्रमुख व अंतर्गत डांबर व खडीकरण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने मुरूम व डस्ट टाकून खड्डे बुजवण्यात यावे 10 शहरातील अत्यंत आवश्यक असलेले काही सुचवलेले विकास कामे मंजूर करण्यात यावा 11 प्रभाग क्रमांक चार मध्ये मंजूर व ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेले कामे लवकर सुरू करण्यात करिता कारवाई करण्यात यावा
वरील सर्व मागण्यांचे निवारण12 शहरातील मुख्य रोडवर बसवण्यात आलेले निष्कर्ष दर्जाचे स्टेट लाईट डेकोरेट पोल अनेक ठिकाणी पडले आहे त्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर दहा टक्के अनामत रक्कम कपात करण्याची कारवाई करण्यात यावा
करून नागरिकांना सुविधा देण्यात याव्या अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदन सादर करताना प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कामगार तथा माजी बांधकाम व पाणीपुरवठा स्वच्छता सभापती शेख जैरुदीन छोटूभाई व त्यांचे सहकारी मनोहर जी ताजने मनुभाई शेख मोहसीन भाई पठाण शब्बीर भाई शेख प्रशांत पिंपरे शेषराव भोयर गुलाबधबे सचिन धवस करण नकवे राजेंद्र दुधलकर कीर्तन विठ्ठल ताजने गुलाब झुंजारे अशोक सोनटक्के दिलीप मेश्राम बबन शिरसागर उपस्थित होते निवेदनाची प्रत पुढील कार्यवाही करिता खासदार प्रतिभा धानोरकर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जिल्हाधिकारी चंद्रपूर त्यांच्याकडे पाठविण्यात आले आहे